एप्रिल रोजी विद्यार्थ्यांची डॉ.आंबेडकर अभिवादन मिरवणूक -महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजन


एप्रिल रोजी विद्यार्थ्यांची डॉ.आंबेडकर अभिवादन मिरवणूक —————महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजन
पुणे : ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ (आझम कॅम्पस)च्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुक्रवार, दि.१४ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९.३० वा. अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
मिरवणुकीचे उद्घाटन ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ पी.ए.इनामदार यांच्या हस्ते होईल. संस्थेचे सचिव प्रा.इरफान शेख यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. मिरवणुकीचे हे १८ वे वर्ष आहे
. संस्थेतील विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मिरवणुकीत सहभागी होणार आहे. आझम कॅम्पसशी संलग्न संस्थांशी संबंधित पदाधिकारी,विश्वस्त देखील सहभागी होणार आहेत.साधू वासवानी चौक येथून मिरवणुकीस प्रारंभ होऊन जिल्हाधिकारी कार्यालयसमोरील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ मिरवणुकीची सांगता होणार आहे.
दरवर्षी ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी तर्फे छत्रपती शिवाजी महाराज, म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात