होर्डिंग दुर्घटनेतील नातेवाईकांना मुख्यमंत्री निधीतून प्रत्येकी 3 लाख रुपयांची मदत जाहीर

eknath-shinde

मुंबई (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – ) पुण्यात कात्रज-देहू मार्गावरील किवळे ओव्हरब्रीज सर्व्हिस रोडवर वादळी वाऱ्यामुळं होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दुःखं व्यक्त केलं, असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे

लोखंडी होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातात दोन जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटना संध्याकाळी 6.30 ची आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले

रावते किवळे परिसरातील कात्रज देहू सर्व्हिस रोडवर वादळ आणि पावसापासून वाचण्यासाठी काही लोक एका दुकानाजवळ उभे होते.

दुकानाजवळ लोखंडी होर्डिंग होते. वादळामुळे दुकानावर होर्डिंग पडले, त्यामुळे 8 जण होर्डिंगखाली दबले गेले.महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण (Maharashtra Bhushan Award) कार्यक्रमात प्रखर उन्हामुळे उष्माघाताच्या धक्क्याने (Sun Stroke) आतापर्यंत 13 नागरिकांचा मृत्यू झाला, ही दुर्दैवी घटना ताजी असतानाच, आता पुण्यातून आणखी एक दुख: घटना घडलेली आहे.

Latest News