राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोगाच्या सल्लागार पदी अली दारूवाला यांची नियुक्ती…


पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
भाजपचे राज्य प्रवक्ते अली दारुवाला यांची राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोगाच्या सल्लागार पदी नियुक्ती करण्या आली आहे.राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंह लालपुरा यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी पुण्यात ‘रोजा इफ्तार ‘ आणि संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.सोमवार, दि. १७ एप्रिल २०२३,सायंकाळी ६.३० वाजता,इमामवाडा, ( कॅम्प ,पुणे ) येथे हा कार्यक्रम झाला.राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोगाच्या सल्लागार पदी अली दारूवाला यांची नियुक्ती केल्याचे पत्र आयोगाचे अध्यक्ष इक्बालसिंह लालपुरा यांच्याहस्ते यावेळी देण्यात आले..सॉलोमन सोफर, डॅनियल पेणकर, चरणजितसिंह साहनी, मौलाना झैदी हे अल्पसंख्य समुदायाचे प्रतिनिधी ,मिलेट अँड वॉटर वुमन ऑफ इंडिया’ शर्मिला ओसवाल , भाजपचे सरचिटणीस राजेश पांडे, नितीन सोनटक्के,अजय खेडेकर, दीपक नागपुरे उपस्थित होते.