PUNE फसवणुक: पुण्यातील अविनाश अर्जुन राठोड यांनी 10 पट्टीनी परताव्याच्या अमिषाला हजारो लोकांची फसवणूक…

crime-News
सुमारे 700 यांनी कोटींची फसवणूक गुन्हा दाखल…

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, २०११ पासून या कंपनीच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक करण्यात आली. या कंपनीकडे पुण्यातील अनेक मोठ्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली. सुरुवातील आरोपी राठोड यांना गुंतवणूकदारांना छोटे-मोठे परतावे दिले. वर्षभरामध्ये त्यांच्याकडे मोठ्याप्रमाणत गुंतवणूक झाली होती. दरम्यान, त्याने विविध कारणे सांगून परतावे देण्याचे टाळल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. आतापर्यंत आरोपी राठोड याने गुंतवणूकदारांची ७०० कोटींची रक्कम जमा केली. आता ती रक्कम घेऊन आरोपी पसार झाला आहेसुरुवातीला दिलेल्या परताव्यामुळे नागरिकांचा आरोपीवर विश्वास बसला होता. त्यातून मिळालेल्या तोंडी प्रसिद्धीमुळे कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली होती. या वर्षभरात कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढले होते. दामदुप्पट मिळत असल्याने काही नागरिकांनी कोटीमध्ये रक्कम गुंतविली आहे. हा आकडा सुमारे ७०० कोटींचा असल्याची माहिती आहे. आता कंपनीचे कार्यालय बंद असल्याने अनेकांची जीवनभराची पुंजी लुटली गेल्याचे समोर आले आहे महिन्याला पाच टक्के मूळ रक्कम व पाच टक्के व्याज असा मिळून दरमहा दहा टक्के परतावा, तसेच २० महिन्यात दामदुप्पट देण्याचा बहाणा करून एका कंपनीच्या फसवणुकीला पुण्यासह राज्यातील हजारो लोक बळी पडले आहेत. बाणेर रस्त्यावरील एपीएस या खासगी शेअर मार्केट कंपनीत २०११ पासून लोक गुंतवणूक करीत होते.दोन आठवड्यापूर्वी परतावा घेण्यासाठी काही लोक कंपनी कार्यालयाकडे गेले होते. त्यावेळी कंपनीचे कार्यालय कुलूपबंद होते. वारंवार फोन करूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. आता या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात मंगळवारी (ता. १८) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अविनाश अर्जुन राठोड असे फसवणूक करणाऱ्या कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कंपनीत पुण्यासह राज्यातील अनेक लोकांनी पैसे गुंतविले आहेत. गेल्या वर्षभरातच हा आकडा सुमारे ७०० कोटी असल्याचा अंदाज आहे.

Latest News