महाराष्ट्र शासनाचा शहर सौंदर्यीकरणाचा पाच कोटी चा पुरस्कार पिंपरी चिंचवड शहराला


मुंबई (ऑनलाईन परिवर्तनाच सामान ) महाराष्ट्र राज्य शासना च्या वतीने दिला जाणारा शहरा सौंदर्यीकरण उरस्कार या वर्षी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेला आज मुख्यमंत्री यांच्या हस्ते पाच कोटींचा पुरस्कार देण्यात आला
कारण राज्य शासनाचा शहर सौंदर्यीकरण व नागरी प्रशासनातील विविध बाबींमध्ये उत्तम कामगिरीबद्दलचा तृतीय क्रमांकाचा र. रू. ५ कोटींचा पुरस्कार महानगरपालिकेला प्रदान करण्यात आला.
नगर विकास दिनानिमित्त महाराष्ट्र शासनामार्फत शहर सौंदर्यीकरण व नागरी प्रशासनातील विविध बाबींमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला जाणारा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माननीय उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्विकारला देण्यात आला.
राज्यात “शहर सौंदर्यीकरण” स्पर्धेत देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर महापालिकेला पहिला क्रमांक मिळाला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे महापालिकेला दुसरा क्रमांक मिळाला. तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पिंपरी-चिंचवड महापालिकेला तिसरा क्रमांक मिळाला आहे.
नगरविकास खात्याचा शहर सौंदर्यीकरण स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. नगरविकास दिनानिमित्त मुंबईत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात हा निकाल जाहीर करण्यात आला. हा निकाल चांगलाच चर्चेत आला आहे. हा निकाल म्हणजे भविष्यातील राजकीय युती आहे का?, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे.

यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे, मनोज सेठीया, उप आयुक्त रविकिरण घोडके, कार्यकारी अभियंता प्रेरणा सिनकर, सहाय्यक आयुक्त सोनम देशमुख आदी उपस्थित होते.