32 ‘आयपीएस’ अधिकाऱ्यांच्या बदल्या….


मुंबई (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) – पोलिस दलातील अप्पर तथा अतिरिक्त पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग-रेंज) आर. बी. डहाळे आणि जे.डी.सुपेकर (प्रशासन) यांची बढतीवर अनुक्रमे राज्य गुप्तवार्ता अकादमीचे संचालक आणि स्पेशल आयजी, तुरुंग तथा कारागृह विभाग म्हणून बदली करण्यात आली आहे
. तर ए. एच. चावरिया आणि प्रवीण पाटील यांची पुण्याच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संजय दराडे यांच्यावर विशेष पोलीस महानिरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे आणि एस. एन. पुरे यांच्यावर विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे विभाग पुणेची जबादारी देण्यात आली आहे
रेंजचे विशेष पोलीस महानिरीक्षक (स्पेशल आयजी) के. एम. प्रसन्ना यांची बदली त्याच पदी राज्य पोलीस मुख्यालयात (आस्थापना) झाली आहे. राज्य राखीव पोलीस दलातील (एसआरपी) डीआयजी (उपमहानिरीक्षक) दीपक साकोरे यांची नवी मुंबईत अॅडिशनल सीपी (गुन्हे) म्हणून बदली करण्यात आली आहे.
तर, नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेले विरेंद्र मिश्रा यांची नियुक्ती मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेत करण्यात आली आहे. मिलिंद मोहिते आणि राजलक्ष्मी शिवणकर यांची नियुक्ती अनुक्रमे गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी), पुणे आणि एसआरपी, दौंड, पुणे येथे करण्यात आली आहे.
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे-फडणवीसांचे ते गेल्यावर्षी आल्यानंतर बदल्यांचा धडाका सुरु झाला. त्यातून पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त (सीपी) कृष्णप्रकाश (केपी) यांच्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांचीही ‘टर्म’ पूर्ण होण्यापूर्वीच बदली झाली.
अजित पवार हे उपमुख्यमंत्री असताना त्यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांना शहरात आणले होते. कृष्णप्रकाश आणि पाटील यांच्याप्रमाणेच आताच्या बदली आदेशातही लोहियांसारख्या काही अधिकाऱ्यांनाही मुदतपूर्व बदलीला सामोरे जावे लागले आहे राज्य पोलीस दलात सोमवारी (ता. २४) मोठा खांदेपालट करण्यात आला. राज्य सरकारने ३२ ज्येष्ठ ‘आयपीएस’ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यातील २५ जणांना पदोन्नती देण्यात आली आहे. तर इतरांच्या बदल्या या नियमित आहेत.
औरंगाबादच्या नामकरणानंतर छत्रपती संभाजीनगरचे पहिले पोलीस आयुक्त म्हणून मनोज लोहिया (Manoj Lohiya) यांची बदली झाली आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये सहआयुक्त (जॉईंट सीपी) होते. त्यांची मुदतपूर्व बदली झाली आहे.बढतीवर अधिकाऱ्याची बदली होताना ती एका ठिकाणाहून दुसरीकडे केली जाते. मात्र, सोमावारी झालेल्या बदल्यांच्या प्रक्रियेत काहीजण ‘लकी’ ठरले आहेत.
त्यात ठाण्याचे पोलीस आयुक्त (सीपी) जयजीतसिंह यांचा समावेश आहे. ठाणे पोलीस आयुक्तपदाचा दर्जा अप्पर तथा अतिरिक्त पोलीस महासंचालकावरून आता महासंचालक (डीजीपी) करण्यात आला आहे. जयजितसिंह यांना प्रमोशन देऊन ठाण्यातच ठेवण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवडचे अतिरिक्त आयुक्त संजय शिंदे यांच्याबाबत घडले आहे.
ते पदोन्नती मिळूनही ते पिंपरी-चिंचवडमध्येच राहिले आहेत. ते आता सहआयुक्त (जॉईंट सीपी) झाले आहेत. तर, राज्य एटीएसचे (दहशतवाद विरोधी पथक) अॅडिशनल डीजीपी यांना पदोन्नतीवर एटीएसचे डीजीपी करण्यात आले आहे
. राज्य पोलीस दलाचे दुसरे ज्येष्ठ आयपीएस अधिकारी आणि राज्याच्या आर्थिक गुन्हे विभागाचे अतिरिक्त महासंचालक बिपीन कुमारसिंह यांना प्रमोशन देऊन त्यांना राज्य सुरक्षा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक केले बढती मिळालेल्यांत तीन अतिरिक्त डीजीपी, बारा डीआयजी (अॅडिशनल सीपी) आणि दहा डीसीपी तथा एसपींचा समावेश आहे. या बढत्यांवरील बदल्यांखेरीज दोन डीआयजी आणि दोन स्पेशल आयजींच्याही बदल्या गृहविभागाने आज केल्या.
तर, नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्यांना त्या देण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त (सीपी) म्हणून बदली झालेल्या लोहियांच्या जागी (पिंपरी-चिंचवडचे जाँईट सीपी) पिंपरी-चिंचवडचे अॅडिशनल सीपी संजय शिंदे यांची पदोन्नतीवर नियुक्ती झाली आहे. पदोन्नती मिळूनही ते शहरातच राहिले आहेत. त्यांच्या रिक्त जागी एसआरपी, दौंडचे कमांडट वसंत परदेशी यांची नेमणूक झाली आहे