रिफायनरी विरोधात आंदोलन, गोळ्या झाडा, खून करा, आम्ही हटणार नाही….

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –

रिफायनरीला स्थानिकांचा तीव्र विरोध केलाय…गोळ्या झाडा, खून करा, आम्ही हटणार नाही असा पवित्रा स्थानिकांनी घेतलाय…सर्वेक्षणाचा आजचा दुसरा दिवस आहे…यासाठी अधिकारी, पोलीस मोठ्या संख्येनं बारसू गावात आले होते…मात्र, रस्त्यावर झोपून महिलांनी पोलिसांची गाडी अडवली…कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही ही ठाम भूमिका ग्रामस्थांची आहे..

.सर्वेक्षणाला विरोध असून, मेलो तरी जागा सोडणार नाही यावर ग्रामस्था ठाम आहेत…आता गावात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून, माध्यम प्रतिनिधींनाही हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत…त्यामुळे सर्वेक्षणाचा वाद पेटण्याची शक्यताय..

बारसू रिफायनरीविरोधात आंदोलन करणा-यांना धमकावलं जातंय.. बारसूत पोलीस दडपशाही करत असून तिथे जालियानवाला हत्याकांड होण्याची भीती खासदार संजय राऊतांनी व्यक्त केलीय…तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बारसूत घटनास्थळी जावं असं आवाहनही राऊतांनी केलंय..

कोकणातल्या बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचा वाद चांगलाच पेटला आहे. या सर्वेक्षणाला विरोध करत ग्रामस्थांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. या आंदोलकांवर पोलिसांच्या (Ratnagiri Police) बळाचा वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे.याबाबत राज्याचे राजकारण चांगलेच तापले असून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी फोन करत सर्वे थांबवण्याबद्दल चर्चा केल्याचे समोर आले आहे. 

रिफायनरीविरोधी संघटनेच्या आणखी तिघांना अटक करण्यात आलीय…रत्नागिरीच्या बारसू गावात ऱिफायनरीचं सर्वेक्षण सुरू आहे…याला स्थानिकांचा विरोध असून, आंदोलन सुरू आहे…यावेळी विरोध संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकरसह तिघांना अटक करण्यात आलीय…रिफायनरी सर्वेक्षणाला विरोध केल्याने राजापूर पोलिसांनी ही कारवाई केलीय…अटक केलेल्या तिघांना रत्नागिरीमध्येच ठेवण्यात आलेयत…

Latest News