रिफायनरीच्या सर्वेक्षण तात्काळ थांबवा, लोकांशी चर्चा करून निर्णय घ्या : शरद पवार यांची उदय सामंत यांना सूचना


मुंबई (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) – शरद पवारांनी हा सर्व्हे थांबवा, लोकांशी आपण चर्चा करुया, एकत्र बसून विश्वासात घेऊन केलं पाहिजे नाहीतर प्रोजेक्ट अडचणीत येईल अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे. यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शरद पवार यांना मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांना कळवतो असे अश्वासन दिले आहे. तसेच उदय सामंत आणि पवार यांच्यात उद्या (२६ एप्रील) भेट होणार आहे. ही भेट शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवसस्थीनी होणार असून या भेटीत बरसू प्रश्नांवर चर्चा होणार आहे
कोकणातल्या रिफायनरीच्या सर्वेक्षणा विरोधातील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. यादरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलन करणाऱ्या २५ महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या महिलांवर सौम्य लाठीचार्ज केला.
कोकणातील प्रस्तावित रिफायनरीला हद्दपार करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू सोलगाव येथे हजारो स्थानिकांचे आंदोलन सुरु आहे. या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली असून पोलिसांनी विरोध करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे
. पण जीव गेला तरी इथेच थांबेन. अशी स्थानिक महिलांची भूमिका आहे.
मात्र यानंतर देखील आंदोलनकर्ते आपल्या मतावर ठाम आहेत. राजापूरमधील महिलेने ‘जीव गेला तरी इथेच थांबेन’ असा इशारा दिला आहे. कोकणात राजापूर बारसू सोलगाव परिसरात क्रूड ऑइल रिफायनिंग करणारी ‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोलियम उद्योग’ प्रस्तावित आहे. भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तावित रिफायनरीला स्थानिकांचा विरोध आहे
कोकणातल्या बारसू-सोलगाव रिफायनरीसाठी सर्वेक्षण सुरू केलं जाणार आहे. या रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. रिफायनरी विरोधी आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने पोलिस दाखल झाले आहेत. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दखल घेतली आहे. पवारांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना फोन केल्याची माहिती मिळत आहे