भारतीय विद्या भवनमध्ये ३० एप्रिल रोजी ‘कवितेस कारण की..’ कार्यक्रमाचे आयोजन


भारतीय विद्या भवनमध्ये ३० एप्रिल रोजी ‘कवितेस कारण की..’ कार्यक्रम –भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन
पुणे ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘आरपार’ प्रस्तुत ‘कवितेस कारण की..’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार , ३० एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमात जयेश पवार,नैनेश तांबे,भैरवी चितळे,सारंग पांपटवार,अपूर्व राजपूत यांचे सादरीकरण होणार आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. हा कार्यक्रम विनामूल्य आहे. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १६३ वा कार्यक्रम आहे