भारतीय विद्या भवनमध्ये २७ एप्रिल ला ‘लक्ष्य’ नृत्य कार्यक्रम-भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन

IMG-20230425-WA0010

भारतीय विद्या भवनमध्ये २७ एप्रिल रोजी ‘लक्ष्य’ नृत्य कार्यक्रम—-भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन

पुणे ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘लक्ष्य ‘ या नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

.गुरुवार , २७ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम होणार आहे. शास्त्रीय नृत्य सादरीकरणाचा हा कार्यक्रम ‘शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था’ यांच्यातर्फे प्रस्तुत केला जाणार आहे.

पुण्यात सुरु असलेल्या ‘पुणे डान्स सिझन-२०२३’ मधील अनेक कार्यक्रममालिकेतील हा कार्यक्रम एक भाग आहे. त्यात डॉ शशिकला रवी(भरत नाट्यम),सुकन्या कुलकर्णी(भरत नाट्यम),नीलिमा हिरवे(कथक) यांचे नृत्य सादरीकरण होणार आहे.

भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे ,तसेच ‘शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या रसिका गुमास्ते,अरुंधती पटवर्धन यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. हा कार्यक्रम विनामूल्य आहे. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १६२ वा कार्यक्रम आहे

Latest News