प्रकाशचित्रकला-एक कला,एक व्यवसाय’ विषयावर सतीश पाकणीकर यांच्याशी संवाद

प्रकाशचित्रकला-एक कला,एक व्यवसाय’ विषयावर सतीश पाकणीकर यांच्याशी संवाद*ज्ञान प्रबोधिनी माजी विद्यार्थी मंडळ कला-संस्कृती गटाकडून आयोजन

पुणे :ज्ञान प्रबोधिनी माजी विद्यार्थी मंडळ कला-संस्कृती गटातर्फे ‘प्रकाशचित्रकला-एक कला,एक व्यवसाय’ या विषयावर ज्येष्ठ प्रकाशचित्रकार(फोटोग्राफर),लेखक सतीश पाकणीकर यांच्याशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवार ,दि २९ एप्रिल २०२३ रोजी संध्याकाळी ७ वाजता हा कार्यक्रम ज्ञान प्रबोधिनी च्या प्रबोध सभागृहात होणार आहे

.प्रकाशचित्रकलेचे शिक्षण आणि अनुभवातून समृद्ध झालेल्या ज्येष्ठ व्यक्तीकडून कलेचे विभ्रम आणि कंगोरे समजून घेण्यासाठी हा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे,अशी माहिती ज्ञान प्रबोधिनी माजी विद्यार्थी मंडळ कला-संस्कृती गटातर्फे मिलिंद संत, डॉ. समीर दुबळे, डॉ. वैदेही केळकर, शिवाली वायचळ यांनी पत्रकाद्वारे दिली. हा कार्यक्रम विनामूल्य आहे

Latest News