पुण्यात एका भिक मागून जगणाऱ्या महिले वर अत्याचार…


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी सध्या चिंतेचा विषय ठरत आहे. खुन, मारामाऱ्या या घटनांनी पुणेकरांमध्ये भितीचे वातावरण पसरले असतानाच एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. रस्त्यावर भिक्षा मागून उदरर्निवाह करणाऱ्या महिलेवर फूटपाथवर (Footpath) बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
भीक मागून स्वतःचा उदरनिर्वाह करनाऱ्या महिलेवर फुलेनगर येथील आरटीओ ऑफिसच्या शेजारी असणाऱ्या मोकळ्या मैदानात अत्याचार केल्याची घटना घडली आहे
25 एप्रिलच्या रात्री त्या जेवण करुन फूटपाथवर झोपल्या होत्या. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्या लघुशंकेसाठी गेल्या असताना एका आरोपीने त्यांना पकडून जबरदस्तीने त्यांच्यावर अत्याचार केले आरटीओ ऑफिस शेजारी असणाऱ्या मोकळ्या मैदानात 25 आणि 26 एप्रिलच्या रात्री हा सर्व प्रकार घडला.
याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पुण्यात लैंगिक अत्याचार आणि बलात्काराच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. रोज अनेक नवीन घटना समोर येत आहेत. त्यामुळे या नराधामांवर कारवाई कधी होणार असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.