विजय म्हणजे लाेकांचा भाजप वरील राग – काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले

नाना पटाेले म्हणाले देशातभाजपच्या विरोधात लाट आहे. त्यामुळेच भाजप विरोधातील चित्र आज बाजार समितीच्या निवडणुकीच्या निकालात दिसून येत आहे. काही ठिकाणी संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे
. परंतु संपुर्ण राज्याचे बाेलायचे झाले तर बाजार समितीच्या निवडणुकीत मविआची ताकद दिसून आली आहे. शेतक-यांचा प्रचंड राग सत्ताधा-यांबाबत आहे. त्यामुळेच राज्यातील बहुतांश कृषी उत्तपन्न बाजार समितीत ( Market Committee Election Results) महाविकास आघाडीने सत्ता काबीज केली आहे
तर काही ठिकाणी सत्तेकडे वाटचाल सुरु ठेवली आहे. यंदाच्या आत्तापर्यंतच्या निवडणूकीच्या निकालावर काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले (nana patole) यांनी हा विजय म्हणजे लाेकांचा भाजप पक्षावरील राग आहे असे मत व्यक्त केले. भाजप (bjp) हा शेतकरी विरोधी आहे, महागाईच्या माध्यमातून जगणे मुश्किल करून ठेवल्याने शेतक-यांनी त्यांची जागा त्यांना दाखवून दिल्याचे पटाेलेंनी नमूद केले