PUNE महापालिकेने 320 जागांची भरती प्रक्रिया सुरू….

पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
पुणे महापालिकेने २०२२ मध्ये राबविलेल्या भरतीमध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य, यांत्रिकी आणि वाहतूक नियोजन, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक, लिपिक, सहाय्यक विधी सल्लागार या पदांची भरती केली. दुसऱ्या टप्प्यात ११ पदांची होणार आहे. यामध्ये क्ष किरण तज्ज्ञाच्या ८ जागा, वैद्यकीय अधिकारी २०, प्राणी संग्रहालय उप संचालक १, पशू वैद्यकीय अधिकारी २, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक २०, आरोग्य निरीक्षक ४०, कनिष्ठ अभियंता (विद्युत) १०, वाहन निरिक्षक ३, मिश्रक/औषध निर्माता १५, पशुधन पर्यवेक्षक १, अग्निशामक विमोचक २०० जागा आहेत.पुणे महापालिकेने ३२० जागांची भरती प्रक्रिया सुरू केलेली असताना यामध्ये १० हजार १७१ जणांनी अर्ज केले आहे. यामध्ये सर्वात तीव्र स्पर्धा मिश्रक/औषध निर्माता या पदाच्या एका जागेसाठी २०२ जण स्पर्धेत आहेत. तर कनिष्ठ अभियंता (विद्युत) या पदाच्या एका जागेसाठी १६७ जणांचे अर्ज आलेले आहेत. त्यामुळे या दोन्ही शैक्षणिक क्षेत्रातील रोजगाराची स्थिती ही समोर आली आहे.पुणे महापालिकेने २०२२ मध्ये ४४८ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर आता २०२३ मध्ये ३२० पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये वर्ग एकच्या ८, वर्ग दोनमधील २३, वर्ग तीन मधील २८९ जागांचा समावेश आहे. यापदभरतीसाठी अर्ज भरण्याची मुदत ३० एप्रिल रोजी मध्यरात्री संपली. या सरळसेवा भरतीसाठी मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात आॅनलाइन परीक्षा होणार आहे. त्यानंतर गुणवत्ता यादीत आलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांची अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल. पुणे महापालिकेत २०१२ पासून पदभरती झालेली नसल्याने अनेक पद रिक्त आहेत. त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. वर्ग तीनचे कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरती केले जात आहेत. पण हे कर्मचारी पुरेसे नाहीत, तसेच कनिष्ठ पदांवर काम करण्यासाठी कायम स्वरुपी कर्मचारी नाहीत, त्यामुळे जुने कर्मचारी पदोन्नतीने वरच्या पदावर गेल्यानंतर त्या जागा रिक्तच राहत आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामात गोंधळ निर्माण होत आहे. ‘‘महापालिकेने ११ पदांसाठी ३२० जागांची भरती सुरू केली आहे. त्याची अर्ज भरण्याची मुदत ३० एप्रिल रोजी संपली. या उमेदवारांची आॅनलाइन परीक्षा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते. याची माहिती उमेदवारांना सात दिवस आधी कळवली जाईल.’’
पदाचे नाव, उपलब्ध जागा आणि अर्ज संख्या
- क्ष किरण तज्ज्ञ -८ – १२
- वैद्यकीय अधिकारी -२० -४५०
- प्राणी संग्रहालय उप संचालक -१- ९
- पशू वैद्यकीय अधिकारी -२- ४७
- वरिष्ठ आरोग्य निरीक्षक -२०- ७३८
- आरोग्य निरीक्षक -४०- २०९
- कनिष्ठ अभियंता (विद्युत) -१०- १६७७
- वाहन निरिक्षक -३- २१६
- मिश्रक/औषध निर्माता -१५-३०३२
- पशुधन पर्यवेक्षक -१- २२६
- अग्निशामक विमोचक -२००- ३५५५