कर्नाटक निवडणुकीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा दाखवली- उद्धव ठाकरे


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “कर्नाटक निवडणुकीच्या माध्यमातून देशातील एकाधिकारशाही आणि हुकूमशाहीच्या पराभवाला सुरुवात झाली आहे”, असं म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावलाकर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 224 जागांपैकी जवळपास 135 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजपला फक्त 65 जागांवर विजय मिळाला. जेडीएसला केवळ 19 जागा मिळाल्या आहेत. तर अपक्षाला काही जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसनं कर्नाटकात जोरदार मुसंडी मारत एकहाती सत्ता मिळवली आहे. कर्नाटकच्या निवडणुकीत भाजपला मात्र, सत्ता राखण्यास यश आलं नाही.ठाकरे म्हणाले, “देशातील एकाधिकारशाही व हुकूमशाहीच्या पराभवाला कर्नाटकमधील निवडणुकीच्या विजयाने सुरवात झाली आहे. सर्वसामान्य माणूस हाच हुकूमशहाचा पराभव करू शकतो. हा विश्वास जनतेने देशाला दिला. कर्नाटकच्या जनतेने शहाणपणाने दिलेल्या निकालाबद्दल त्यांचे अभिनंदन”, अशा शब्दांत ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या”कर्नाटक निवडणुकीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा दाखवलीचा विजय झाला. पंतप्रधान मोदी आणि शाहंच्या बळजबरी सत्तेचे जोखड कर्नाटकच्या जनतेने निर्भयपणे फेकून दिले. काँग्रेसने लोकांच्या प्रश्नांवर निवडणूक लढवली आणि जिंकली. आता 2024 च्या विजयाची ही नांदी आहे “, असं म्हणत त्यांनीआणि राहुल गांधी यांचेही अभिनंदन केले.