कर्नाटकच्या निवडणुकीचा कोणताही परिणाम देशात आणि महाराष्ट्रात होणार नाही- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


मुंबई (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) –
2018 ला भाजपच्या 106 जागा निवडून येत आम्हाला 36 टक्के मत मिळाले होते. आता या निवडणुकीत भाजपला 35.06 टक्के मतं मिळाली. त्यामुळे भाजपची 0.4 टक्के मतं कमी झाली. तर 2018 ला38 टक्के, जेडीएसला 18 टक्के मतं मिळाली होती. आता जेडीएसची 5 टक्के मतं कमी झालेत. जेडीएसची ही मतं काँग्रेसला मिळाले. त्यामुळे काँग्रेसला त्याचा फायदा झाला. मात्र, भाजपची मतं कुठंही कमी झालेले नाहीत कर्नाटकचं उदाहरण देऊन काहीजण देश जिंकल्यासारखं सांगत आहेत. पण त्यांना माझा सल्ला आहे.निवडणुकीच्या निकालावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे
उत्तर प्रदेशच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल देखील आजच समोर आलेत. येथे एकहाती सत्ता आली आहे. असं म्हणतात जे जिंकतात ते देश जिंकतात. त्यामुळे कर्नाटकाच्या निवडणुकीचं उदाहरण देऊन देश जिंकल्या सारखं सांगण्यात कोणताही अर्थ नाहीकर्नाटकच्या निवडणुकीचा कोणताही परिणाम देशात आणि महाराष्ट्रात होणार नाही: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. कर्नाटकात काँग्रेसला 224 जागांपैकी जवळपास 135 पेक्षा जास्त जागा मिळताना दिसत आहेत. तर भाजपला फक्त 63 जागा मिळताना दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसचा सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे
. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहेकर्नाटकात भाजपला पराभवाचा धक्का बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी देखील या निवडणुकीत जोरदार प्रचार केला होता. मात्र, तरी देखील भाजपला एवढं यश मिळवता आलं नाही.