महाराष्ट्रातील जनताही गद्दारांच्या अनैतिक, भ्रष्टाचारी राजवटीला त्यांची जागा दाखवून देईल – आदित्य ठाकरे

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – कर्नाटकप्रमाणेच महाराष्ट्रातील जनता या गद्दरांच्या राजवटीला त्यांची जागा दाखवून देईल, पहिल्याच संधीत आपल्याला निवडणुकीत मतदान करण्याची संधी मिळेल! कर्नाटकातील त्यांच्या शानदार विजयासाठी @INCIndia चे अभिनंदन! जनतेने दाखवून दिले आहे की ते शांतता, प्रेम आणि भ्रष्ट शासनाच्या विरोधात निर्णायकपणे मतदान करतीलकर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मिळवलेल्या स्पष्ट बहुमताननंतर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी काँग्रेसचे अभिनंदन केले आहे. कर्नाटकाप्रमाणेच महाराष्ट्रातील जनताही गद्दारांच्या अनैतिक, भ्रष्टाचारी राजवटीला त्यांची जागा दाखवून देईल असे आदित्य ठाकरे म्हणाले.आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करून म्हटलं की, कर्नाटकात 40 टक्के कमिशन सरकार असेल तर महाराष्ट्र जबरदस्तीने त्याहून अधिक भ्रष्ट, बिल्डर-कंत्राटदारांच्या राजवटीत ढकलला गेला आहे, जे असंवैधानिक, अनैतिक आणि भ्रष्टाचारी आहे.’देशातील एकाधिकारशाही व हुकूमशाहीचा पराभव होण्याची सुरुवात कर्नाटकातील विजयाने झाली आहे. कर्नाटकच्या जनतेने शहाणपणाने दिलेल्या निकालाबद्दल त्यांचे अभिनंदन,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.कर्नाटक निवडणुकीने देशाच्या राजकारणाला नवी दिशा दाखवली व आशेचा किरण दाखवला. काँग्रेसचा प्रचंड विजय झालाच, पण पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहांच्या बळजबरी सत्तेचे जोखड कर्नाटकच्या जनतेने निर्भयपणे फेकून दिले, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.’कर्नाटकच्या निवडणुकीत हिंदू, मुसलमान, बजरंगबली, हिजाबसारखे धार्मिक तणावाचे मुद्दे चालले नाहीत. काँग्रेसने लोकांच्या प्रश्नांवर निवडणूक लढवली व जिंकली. २०२४ सालच्या विजयाची ही नांदी आहे. प्रियंका गांधी व राहुल गांधी यांचे खास अभिनंदन,’ असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले

Latest News