किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश…

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येप्रकरणी पिंपरी-चिंचवड (Pimpari Chinchwad Police) मुख्य चार आरोपींना अटक केली आहे.

रघु धोत्रे, आदेश धोत्रे, श्याम निगडकर आणि संदीप मोरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. आरोपींना आज वडगांव मावळातील जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे

पुण्यातील (Pune) मावळमध्ये भरदिवसा मुळशी पॅटर्न स्टाईलने जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची हत्या (Kishor Aware Murder Case) करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण मावळ तालुका हादरला आहे.

आता या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहेकिशोर आवारे यांच्यावर तळेगाव पालिकेच्या कार्यालयासमोरशुक्रवारीहल्ला झाला होता. किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेण्यासाठी पालिका कार्यालयात आले होते.

मुख्याधिकारी यांची भेट घेऊन ते बाहेर आले. त्यावेळी दबा धरून बसलेल्या चार जणांनी किशोर आवारे यांच्यावर हल्ला केला. यामधील दोघांनी त्यांच्यावर गोळीबार केला तर दोघांनी कोयत्याने वार केले.या हल्ल्यात किशोर आवारे गंभीर जखमी झाले.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना तात्काळ सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेले. पण उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषीत केले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, किशोर आवारे यांच्या कुटुंबियांनी आमदार सुनील शेळके आणि त्यांच्या भावावर किशोर आवारे यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे.

Latest News