घोडेबाजार थांबवण्यासाठी काँग्रेसने सर्व आमदारांना बंगळुरूला


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – राज्यात काँग्रेसला 150 पेक्षा कमी जागा मिळाल्यास भाजप काँग्रेसचे आमि जेडीएसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे राज्यात काँग्रेसवर संकट येऊ शकते. त्यामुळेच घोडेबाजार थांबवण्यासाठी काँग्रेसने सर्व आमदारांना बंगळुरूला बोलावले आहे
. तसेच यासाठी हैद्राबादमध्ये एक रिसॉर्टही बुक करण्यात आल्याचे समोर आले आहे. काँग्रेसचे संकटमोचक डीके शिवकुमार आणि खरगे यांच्यावर आमदार सांभाळण्याची जबाबदारी आहे. हे दोन्ही नेते उमेदवारांशी चर्चा करत आहेतकर्नाटक विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले आहेत
. या निवडणुकीत भाजपला काँग्रेसने धोबीपछाड दिलं आहे. काँग्रेसला पहिल्या कलामध्ये बहुमत मिळालं आहे. काँग्रेसने 115 पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपला अवघ्या 79 जागांवर आघाडी मिळाली आहे.विजयाकडे वाटचाल सुरू असतानाच कॉँग्रेसच्या गोटात हालचाली सुरू झाल्या आहेत
. बहुमत मिळाले तरी कर्नाटकात ऑपरेशन लोटस होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळेच कर्नाटक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के शिवकुमार यांनी हालचाली सुरू केल्या आहेतयाबाबत अधिक माहिती अशी की, अत्यंत चुरशीने होत असलेल्या कर्नाटक निवडणुकीमध्ये काँग्रेसनेबहुमताकडे वाटचाल सुरु केली आहे. मतमोजणीच्या पहिल्या दीड तासांच्या कलांमध्ये काँग्रेसने 131 जागांवर आघाडी मिळवली आहे, तर प्रतिस्पर्धी भाजपने 73 जागांवर आघाडी मिळाली आहे.