कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत, आश्वासनं पहिल्याच कॅबिनेटमध्ये पूर्ण करणार – राहुल गांधी

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने जनतेला दिलेली आश्वासनं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये काँग्रेस पूर्ण करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये काँग्रेसने जाहिरनामा प्रसिद्ध करत पाच मोठ्या घोषणा केल्या होत्या.

आता दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी काँग्रेस पहिल्याच कॅबिनेटमध्ये निर्णय घेईल, असं राहुल गांधीनी सांगितलं. काँग्रेसने प्रचारादरम्यान नेमकी काय आश्वासनं दिली होती ती पाहूयात कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे.

कर्नाटकात काँग्रेसला जवळपास 137 जागा मिळताना दिसत आहेत. तर भाजपला फक्त 63 जागा मिळताना दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसचा सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्यामुळे काँग्रेसच्या विविध कार्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोष

केला आहे मिळत आहे, – गृहज्योती योजना : प्रत्येक कुटुंबाला दरमहा 200 युनिट वीज मोफत देण्याचं आश्वासन दिलं होतं.

– गृहलक्ष्मी योजना: महिला कुटुंबप्रमुखाला दरमहा 2 हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं.

– शक्ती योजना : महिलांना राज्यभर सरकारी परिवहन सेवेच्या बसमधून मोफत प्रवास देण्याचं आश्वासन दिलं होतं.

– अन्नभाग्य योजना : दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाला दरमहा 10 किलो तांदूळ किंवा रागी-ज्वारीसारखे भरडधान्य देण्याचे आश्वासनं दिलं होतं.

– युवा निधी योजना : बेरोजगार पदवीधारकांना दरमहा 3 हजार रुपये व बेरोजगार डिप्लोमा धारकाला दरमहा 1500 रुपये अर्थसाह्य देण्याचं आश्वासन दिलं होतं\दरम्यान, कर्नाटक विधानसभाचित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. यामध्ये काँग्रेसचा सत्ता स्थापन कर

ण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकार स्थापन केल्यानंतर आपण जाहीरनाम्यात दिलेली पाच वचने मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत पुर्ण करु

Latest News