कर्नाटक मुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला आहे. डी.के शिवकुमार यांची माघार


बेंगलोर (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल यांच्या घरी झालेल्या बैठकीनंतर हा तिढा संपला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आज सिद्धरामया यांच्या नावाची घोषणा करणार आहेत. मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामया यांनी यापूर्वी जबाबदारी सांभाळली आहे. ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत.
वीस मे रोजी ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.डी.के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानं त्यांचे भाऊ खासदार डी. के. सुरेश यांनी नाराजी व्यक्त केली आहे. चार दिवसापासून याबाबतचा वाद सुरु होता. काल रात्री या वादावर पडद्या पडलाकर्नाटक मुख्यमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला आहे.
डी.के शिवकुमार यांनी माघार घेतली आहे. पक्षश्रेष्ठींनी सांगितलेल्या सर्व बाबी मान्य केल्या आहेत. सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. तर डी. के. शिवकुमार हे उपमुख्यमंत्री असतील
. बुधवारी रात्री उशिरा हा निर्णय घेण्यात आला.डी.के. सुरेश म्हणाले, “पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या या निर्णयावर मी पूर्णपणे आनंदी नाही, पण कर्नाटकाच्या हितासाठी आणि कर्नाटकच्या जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी यांनी हे स्वीकारले आहे.
आता यशाचा मोठे शिखर गाठायचं आहे. भविष्यात मिळणाऱ्या मुख्यमंत्रीपदाच्या प्रतिक्षेत आहोत,”दुसरीकडे सिद्धरामया यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याने त्यांचे समर्थक आनंदोत्सव साजरा करीत आहेत. सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.