बारावीचा निकाल जाहीर…राज्यात कोकण विभागातील ९६.०१ मुंबई विभागाचा ८८.१३ टक्के पुणे 93.34


राज्यात कोकण विभागातील ९६.०१ टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर मुंबई विभागाचा ८८.१३ टक्के असा सर्वात कमी आहे. पुणे विभागातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९३.३४ टक्के इतकी आहे.
Resultमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी- मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत १४लाख १६ हजार ३७१ विद्यार्थ्यांपैकी ९१.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
पुणे विभागातील हा विद्यार्थी असून त्याला केवळ १५.३३% एवढे सरासरी मार्क मिळाले आहेत. इंग्रजी विषयात ९ मार्क, मराठी विषयात २५ मार्क, हिंदीमध्ये २० मार्क, इतिहास विषयात २२ मार्क, राज्य शास्त्र या विषयामध्ये १३ मार्क आणि अर्थशास्त्र या विषयामध्ये अवघे ३ मार्क या विद्यार्थ्याला मिळाले आहेतमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज बारावीचा निकाल जाहीर केला.
त्यामध्ये अनेक विद्यार्थी नापास झाले असून ९१.२५ टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. तर अनेकांना पडलेले मार्क पाहून आपल्यालाही धक्का बसेल. सध्या असाच एक निकाल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
.१२ वीचा निकाल लागल्यानंतर त्याच्या मित्र मंडळींनी त्याच्या निकालाचा हा फोटो सोशल मीडियावर स्टेटस ला ठेवला आहे. त्याला अनेक मित्रांकडून पाठिंबा देण्यात येत आहे तर त्याचे अनेक मित्रांनी अभिनंदनही केले आहे12th Exam