पुणे शहराध्यक्षराध्यक्ष जगदीश मुळीक यांनीही पुणे लोकसभा ही जागा लढविण्याबाबत इच्छा, संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाही…


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
केंद्रीय निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मतदान साहित्यासह इतर अनुषंगिक माहिती सादर करण्याबाबत पत्र पाठविले आहे. या निवडणुकीसाठी बंगळुरूहून पुण्याला ४२०० मतदान यंत्रे दाखल झाली आहेत.भाजपकडून या पोटनिवडणुकीसाठी तीन नावांची चर्चा सुरू आहे. या तीन जणांपैकीच एकाला तिकीट मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. भाजपकडून पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी खासदार संजय काकडे यांच्या नावाची चर्चा आहे.खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाच्या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक होण्यावर केवळ शिक्कामोर्तब बाकी आहेशहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनीही ही जागा लढविण्याबाबत इच्छा व्यक्त केली आहे. ते माध्यमांशी बोलत होते. “पक्षाने पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी संधी दिली तर त्या संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाही”पुणे लोकसभा पोटनिवडणुकीची अद्याप निर्णय झालेला नाही, जिल्हा प्रशासनाचा तो तयारीचा भाग आहे. मात्र जर निवडणूक लावली तर भाजप ही पोटनिवडणूक लढवण्यास तयार आहे. पुणेकरांनी केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास दाखवला आहे, असं मुळीक म्हणाले.कर्नाटकातील विधानसभा निवडणूक संपल्यानंतर बंगळूरुहून (Karnataka) ईव्हीएम मशीन्स, पाच हजार ७० व्हीव्हीपॅट पुण्यात आणण्यात आल्या आहेत. या मशिन्सवर पुणे पोटनिवडणूक (Pune By Election) असे स्टिकर्स लावण्यात आले आहेत. तीस इंजिनिअर्सची नियुक्ती करण्यात आली आहेमतदार याद्या अद्यायावत करणे, मतदान केंद्रे निश्चित करण्याची कामे पूर्ण झाली आहेत. दरम्यान, या पोटनिवडणुकीबाबत अद्याप कोणतीही सूचना प्राप्त झालेली नसल्याची माहिती पुणे उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. असे असले तरी या निवडणुकीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे