”संसद भवन” लोकांच्या पैशानं उभारलेलं आहे. त्यामुळे मी उद्घाटन सोहळ्याला जाणार – माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – जेडीएसचे प्रमुख एच डी देवेगौडा यांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. देवेगौडा म्हणाले, “संसद भवन हे काही भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्यालय नाही. लोकांच्या पैशानं उभारलेलं संसद भवन आहे. त्यामुळे मी उद्घाटन सोहळ्याला जाणार आहे असं देवेगौडा म्हणाले. मात्र, यासोहळ्याला संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर 20 राजकीय पक्षांनी बहिष्कार घातला आहे. यामध्ये काँग्रेस, टीएसी,डीएमके, जेडीयू, आप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), माकप, समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय जनता दल या बड्या पक्षांचा समावेश आहे.विरोधकांनी संसद भवनाच्या उद्घाटनसोहळ्याला बहिष्कार टाकला असतानाच आता विरोधी पक्षांपैकी केवळ देवेगौडाच नाही तर आंध्रचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडूंची तेलुगू देशम पार्टी (TDP), ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची बिजू जनता दल (BJD),शिरोमणी अकाली दल, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांची बहुजन समाज पार्टी, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांचा वाएसआर काँग्रेस पक्ष (YSRCP) आणि लोक जनशक्ति पार्टी (पासवान) हे उपस्थित असणार आहेतनवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांनी नवीन संसद इमारतीचं उद्घाटन पंतप्रधान मोदींऐवजी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते व्हावं अशी आग्रही मागणी धरत कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. एकीकडे नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरुन विरोधक एकवटले असतानाच माजी पंतप्रधान व जनता दल सेक्युलरचे प्रमुख एच डी देवेगौडा यांनी मात्र मोठं कार्यक्रमाला जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच विरोधकांनाही टोला लगावला आहे.मोदी सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला नवीन संसद भवनाचं उद्घाटन येत्या २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, या उद्घाटन सोहळ्यावर विरोधकांच्या बहिष्काराचं सावट असणार आहे. काँग्रेससह 20 राजकीय पक्षांनी संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला विरोध दर्शवला आहे. त्यानंतर देवेगौडांनी सोहळ्याला जाणार असल्याचा घोषणा केल्यानं राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत

Latest News