समीप कुलकर्णी यांच्या ‘ सतार वादन ‘ कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद


समीप कुलकर्णी यांच्या ‘ सतार वादन ‘ कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद—‘भारतीय विद्या भवन’,‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन
पुणे ःभारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित समीप कुलकर्णी यांच्या ‘सोलो सितार कॉन्सर्ट ‘ या सतार वादन कार्यक्रमाला शनीवारी चांगला प्रतिसाद मिळाला .त्यांना तबल्यावर रोशन चांदगुडे यांनी साथ संगत केली.समीप कुलकर्णी हे उस्ताद उस्मान खान,पद्मश्री उस्ताद शाहीद परवेझ यांचे शिष्य आहेत.
शनीवार, दि.२७ मे २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम झाला.भारतीय विद्या भवनचे प्रसिध्दी प्रमुख डॉ. दीपक बीडकर यांनी कलाकारांचा सत्कार केला
.समीप कुलकर्णी यांनी सुरूवातीस राग श्यामकल्याण सादर केला. त्यात आलाप,जोड, उपज, छाला पेश केला. ताल हनुमंत मध्ये साडेदहा मात्रांच्या तालातील स्वरचित रचना सादर केली. ताल एक ताल, तीन ताल मधील रचना सादर केल्या. राग मिश्र खमाज मध्ये धून सादर केली. या सर्व सादरीकरणाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
मेडलेचा वापर करून अनेक बहारदार मराठी -हिंदी गीते सादर केली. रसिकांनी टाळयांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली.हा कार्यक्रम विनामूल्य होता.‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १६६ वा कार्यक्रम होता