डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड

IMG-20230527-WA0022

डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड

पुणे :

येथील डॉ. बाळकृष्ण दिगंबर दामले यांची कृष्णा विश्व विद्यापीठ, कृष्णा हॉस्पिटल कराड येथे ‘संचालक, डिस्टन्स अँड ऑनलाईन एज्युकेशन’या पदावर निवड झाली आहे. ते फुलब्राईट स्कॉलर (अमेरिका) असून त्यांनी सिरॅक्युज युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्क येथून टेलिव्हिजन,रेडियो आणि फिल्म या विषयात एम.एस. केले आहे.

मुंबई येथील देवीप्रसाद गोयंका मॅनेजमेंट कॉलेज ऑफ मीडिया स्टडीज येथे फाउंडर प्रिन्सिपल/डीन म्हणूनही काम केले आहे.शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, येथे अनेक कार्यक्रमांची निर्मिती व संशोधन केले आहे.

त्यांना त्याबद्दल अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.सध्या त्यांनी वैद्यकीय शिक्षणामध्ये प्रथमच ऑडिओ व्हिज्युअल टेक्नॉलॉजी चा वापर करण्याचे काम सुरू केले आहे.

Latest News