‘कसबा’ प्रमाणे पुणे ‘लोकसभा’ पोटनिवडणुक महाविकास आघाडीस सहज जिंकता येईल…


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
कसेल त्याची जमीन या प्रमाणे जो जिंकेल त्याची जागा. हे सूत्र ठरले तर ‘कसबा’ प्रमाणे पुणे ‘लोकसभा’ पोटनिवडणुक महाविकास आघाडीस सहज जिंकता येईल. जागांचा आकडा वाढविण्याचा हट्ट अनाठायी आहे. जिंकेल त्याची जागा याच सूत्राने महाराष्ट्र आणि देश जिंकता येईल. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाने थोडा थोडा त्याग करावाच लागेल” असं संजय राऊत म्हणाले
पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेच्या जागेची पोटनिवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, या जागेवर काँग्रेस राष्ट्रवादीमधील नेतेमंडळींकडून करण्यात आलेल्या दावे प्रतिदाव्यांनी महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
एकीकडो पुणे लोकसभेची जागा काँग्रेस व राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच सुरु असतानाच आता यात ठाकरे गटानं उडी घेतली आहे. खासदार संजय राऊत यांनी पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवरुन सूचक टि्वट केलं आहे.ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी टि्वट केलं आहे.
या टि्वटद्वारे त्यांनी महाविकास आघाडीत पुणे लोकसभेवरुन सुरु असलेल्या राजकारणावर भाष्य केलं आहे. जागांचा आकडा वाढविण्याचा हट्ट अनाठायी आहे. जिंकेल त्याची जागा याच सूत्राने महाराष्ट्र आणि देश जिंकता येईल. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाने थोडा थोडा त्याग करावाच लागेल असा सल्ला संजय राऊतांनी आघाडीतील काँग्रेस ,पुणे लोकसभा जागेवरुन महाविकास आघाडी त तिढा निर्माण झाला आहे.
यावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेतेमंडळींकडून वेगवेगळे विधान करण्यात येत आहे.याच पार्श्वभूमीवर आता खासदार संजय राऊतांनी मर्मावर बोट ठेवतानाच आघाडीला सबुरीचा सल्लाही दिला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुणे लोकसभेच्या जागेवर दावा ठोकला आहे. पुण्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे.
पुण्याची सध्याची स्थिती पाहिली तर कुणाचे आमदार जास्त आहेत, हे पाहिलं पाहिजे. त्यांना पडलेली मतं पाहिली पाहिजेत, असं अजित पवार म्हणालेत.तर, काँग्रेसकडे याआधीपासूनच ही पुण्यातील जागा होती. पण काँग्रेसला ती जागा जिंकता आली नाही. आम्ही बोलून काहीही उपयोग नाही. तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते बसून याबाबत निर्णय घेतील