वाघोली भागात प्रेयसीने केला प्रियकराचा खून…

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –

पुण्यातील वाघोली भागात प्रेम प्रकरणातून प्रेयसीने प्रियकराचा खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतलीयाबाबत समोर आलेल्या माहितीनुसार,या घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच या हल्ल्यात प्रेयसीही गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून लोणीकंद पोलिस अधिक तपास करत आहेत.

पुण्यातील वाघोली  परिसरात एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये संबंधि तरुण आणि प्रियकर तरुणी राहत होते. दोघांमध्येही प्रेम संबंध होते. मात्र आज (२९, मे) पहाटेच्या सुमारास प्रेयसीने घरातील भाजी कापण्याच्या चाकूने प्रियकरावर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रियकराला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

Latest News