पुणे काँग्रेसचं मेरिट असेल तिथे दावा करणारच – नाना पटोले

मुंबई (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) – आगामी लोकसभा निवडणुकांचे जागावाटप हे मेरिटनुसारच घेतले जाणार. ज्या जागी काँग्रेसचं मेरिट असेल तिथे काँग्रेस दावा करणारच. पुणे काँग्रेसचं मेरिट आहे. निवडणुकांवेळी जी परिस्थिती होती असेल, त्यानुसार तेव्हा काही निर्णय घेतले आहे

काँग्रेस – राष्ट्रवादीच्या परंपरागत आघाडीमध्येही पुणे लोकसभेची जागा ही काँग्रेसकडे होती. त्यामुळे या आताच्या निवडणुकीत पुण्याच्या जागेवर काँग्रेसचाच दावा आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी या जागेवर विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा सांगितला होता.

अजित पवारांच्या याच दाव्यावर नाना पटोले म्हणाले, ज्याचं मेरिट त्यालाच जागा मिळायला हवी, २०१४ आणि २०१९ ची परिस्थितीत आणि आजच्या परिस्थितीत फरक पडलेला आहे. आता निवडणुका पार पडणार आहेत. मेरिटनुसार निर्णय घेऊ, असे काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत

पुण्याच्या जागेवर दावे प्रतिदावे होत असताना, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी भाष्य केले आहे. या मुद्द्यावर शरद पवार यांना पुण्यात पत्रकारांनी प्रश्न विचारण्यात आला.यावर पवार म्हणाले की, “ठिक आहे पाहूया, जे योग्य आहे ते बघूया. काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे आम्ही तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून, यावर योग्य तो मार्ग काढू. यात काळजी करण्याचं काही एक कारण नाही. अशी मागण्याआणि दावा सगळेच पक्ष करत राहतात. पण, त्या जागी शेवटी कोण प्रभावीपणे लढत देवून विजय मिळवतो, ते पाहावं लागेलआगामी लोकसभा निवडणुकीला एक वर्षाचा अवधी राहिला आहे. यामुळे पुण्याच्या जागेवर पोटनिवडणूक लागणार की नाही, याबाबत शंका होती. मात्र, पोटनिवडणूक लागणारच असल्याची माहिती मिळाली आहे. पुण्यात स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ताकद जास्त आहे, पुण्याची जागा लढवायला आपण इच्छुक आहोत, असे ते म्हणाले.“सद्य परिस्थिती पाहिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थानिक पातळीवर ताकद जास्त आहे. महापालिकेत आम्ही चांगली ताकद दाखवली. या ठिकाणी आमचे ४० नगरसेवक निवडून आले होते. तर काँग्रेसचे दहाच नगरसेवक होते. शहरामध्ये राष्ट्रवादीचे दोन आमदारही आहेत.

Latest News