हडपसर मध्ये 20 वर्षीय तरुणीवर वस्तीगृहामध्येच अत्याचार…

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -)विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या एका मुलीवर वस्तीगृहातील कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. लॉरेन्स फ्रॉन्सिस अँथेनी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात पिडीत तक्रार दाखल केली आहे
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वस्तीगृहामध्येच वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. तक्रारदार तरुणी ही शहरातील एका शाळेत शिक्षण घेत असताना वस्तीगृहात वास्तव्यास होती.
पुणे येथील हडपसर मध्ये त्यावेळी लॉरेन्स हा त्या ठिकाणी काम करत होता. त्याने संबंधित तरुणीला, पिंपरी चिंचवड येथे नवीन वस्तीगृह चालू करणार आहे असं सांगितले. तसेच त्याठिकाणी इथल्या वस्तीगृहापेक्षा चांगली सुविधा आम्ही देणार असे सांगून त्याने मुलीस घरी घेऊन गेलात्यानंतर मुलीकडून घरातील कामे करुन घेत पत्नी व मुले घरी नसताना, तिच्याशी जबरदस्तीने शारिरिक संबंध प्रस्थापित केले
. तसेच मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करुन तो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने अनेकदा अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात पिडीत तरुणीने तक्रार दाखल केली असून पोलिस अधिक तपास करत आहेत