पुणे: आयुक्त रामोड यांच्या कार्यालयावर ‘सीबीआय’चा छापा…


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
पुणे महसूल विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ.अनिल गणपतराव रामोड यांच्याविरोधात तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना सीबीआयने अटक केली आहे. तसेच यावेळी सीबीआयने तपासादरम्यान अधिकाऱ्याकडून सुमारे सहा कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहेपुणे महसूल विभागातील अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड यांच्या विभागीय आयुक्त कार्यालयासह बाणेर, नांदेडमधील येथील घरावर सीबीआयने शुक्रवारी (दि.९) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास छापे टाकले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आता या छापेमारीत सीबीआयच्या हाती मोठं घबाड लागलं असून तब्बल जवळपास दहा तासांनंतरही पथकाकडून झाडाझडती सुरु आहे.अतिरिक्त विभागीय आयुक्तांविरोधात चार दिवसांपूर्वी तक्रारदाराने तक्रार केली होती. माळशिरस येथील एका शेतकर्याच्या जमिनीचे भू-संपादन झाले होते. त्याचा मोबदला लवकरात लवकर देण्यासाठी अधिकारी रामोड यांनी 10 लाखांची मागणी होती. संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर ८ लाख रुपयांची लाच घेताना अनिल रामोड सापडले. ही लाच घेताना सीबीआयने त्यांना रंगेहाथ पकडले.सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भूसंपादन कायद्याशी संबंधित प्रकरणे पाहत असल्याचा तक्रारीत आरोप करण्यात आला आहे. खेड्यातील शेतकरी त्यांच्या जमिनीचा जास्त मोबदला मागत आहेत आणि तक्रारदार अतिरिक्त विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तसेच सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी राष्ट्रीय महामार्गांनुसार लवाद यांच्याकडे अधिक मोबदला मिळावा म्हणून त्यांची प्रकरणे मांडत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहेसीबीआयमार्फत पुण्यातील तीन ठिकाणी आरोपींच्या अधिकृत आणि निवासी जागेवर छापेमारी सुरु असून त्यात सहा कोटी रुपयांची रोकड, स्वतःच्या आणि कुटुंबाच्या नावावर असलेल्या 14 स्थावर मालमत्ता,मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे; गुंतवणूक आणि बँक खात्यांचा तपशीलासह महत्वाची कागदपत्रं जप्त करण्यात आलं आहे.शनिवारी शिवाजीनगर येथील न्यायालयात रामोड यांना हजर करण्यात येणार आहेत. या अधिकाऱ्याची आणखी कुठे संपत्ती आहे का याचा शोध सीबीआयकडून करण्यात येत आहे. तब्बल सहा कोटींची रक्कम व कागदपत्रे पोलिसांनी जप्त केले आहेत.