महिलांना सामान्य करात दिलेली सूट पूर्ववत करा – प्रा. आल्हाट

*महिलांना सामान्य करात दिलेली सूट पूर्ववत करा – प्रा. आल्हाट**-

आंदोलन छेडण्याचा इशारा*

पिंपरी, १० जून – पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने महिलांना सामान्य करामध्ये 50 टक्के सूट जाहीर केली. काही कालावधीनंतर या सवलतीमध्ये घट करत ही सवलत 30 टक्क्यांवर आणली आहे.हा एक प्रकारे महिलांवर अन्याय असून सामान्य करातील सूट पूर्ववत करा अन्यथा आंदोलन छेडले जाईल असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष प्रा. कविता आल्हाट यांनी दिला आहे.

याबाबत प्रा. कविता आल्हाट यांनी आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात आल्हाट यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सामान्य करामध्ये महिलांना ५० टक्के सवलत होती, परंतु प्रशासनाने या सवलती मध्ये घट केली.

आता 50 टक्के ऐवजी महिलांना करामध्ये ३० टक्के केलेली आहे. एकीकडे सरकार महिलांच्या सबलीकरणाचा विचार करते आहे. आणि दुसरीकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिका महिलांना सवलती पासून वंचित ठेवण्याचे काम करत आहे. तातडीने महापालिकेने ही सवलत पूर्ववत करावी याबाबतचे आदेश आयुक्तांनी द्यावेत अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा आल्हाट यांनी दिला आहे.

उपस्थित शहरअध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे, जेष्ठ नेते नाना काटे,मा.महापौर संजोक भाऊ वाघिरे ,युवकअध्यक्ष इम्राहान शेख, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, मा विरोधी पक्षनेते,राजू मिसाळ ,नगरसेवक प्रशांत शितोले ,वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे,अर्बन सेल अध्यक्ष मनीषा गटकळ,मुख्य सांघटिका मिरा कदम, इ.पदाधिकारी उपस्थित होते

Latest News