सकारात्मक आशा निर्माण करण्याचे काम ज्योतिषांनी करावे : रवींद्र प्रभुदेसाई


सकारात्मक आशा निर्माण करण्याचे काम ज्योतिषांनी करावे : रवींद्र प्रभुदेसाई
-*ज्योतिश्री अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचे उद्घाटन*
पुणे:श्री ज्योतिष संशोधन केंद्र (जळगाव )तर्फे पुणे शहरात आयोजित ज्योतिश्री अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचे उद्घाटन ज्येष्ठ उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई यांच्या हस्ते रविवारी,११ जून रोजी सकाळी झाले.स्वागताध्यक्षा सौ.जयश्री बेलसरे , संयोजक ज्योती जोशी, नितीन कश्यप(दिल्ली), गोविंद कुलकर्णी(ब्राह्मण महासंघ),नवीनकुमार शहा,आनंद दवे (हिंदू महासंघ),सुनील पुरोहित (मुंबई),सौ.सुनीता पागे,आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
अभिजित प्रतिष्ठान, दि इन्स्टिट्युट ऑफ डेस्टिनी मॅनेजमेंट मुंबई,द लीला टॅरो (पुणे) व पितांबरी प्रॉडक्टस प्रा.लि. यांच्या सहकार्याने अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण महाराष्ट्रातील ३१ ज्योतिष संस्थांचा सक्रिय सहभाग यात आहे.
हे अधिवेशन द प्रेसिडेंट हॉटेल (प्रभात रस्ता ) येथे ११ व १२ जून २०२३ या कालावधीत सकाळी ९.३० ते सायंकाळी ६. ३० या वेळेत सुरु राहणार आहे.अधिवेशनाचे हे तिसरे वर्ष आहे. या अधिवेशनामध्ये दोन दिवस ज्योतिष विषयक भरगच्च संवाद,विचारांची रेलचेल आहे. मान्यवरांच्या व्याख्यानासह विविध पुरस्कारांचेही वितरण केले जाणार आहे
.’ज्योतिष हे सर्वांना मार्गदर्शन करणारे शास्त्र आहे.सकारात्मक आशा निर्माण करण्याचे काम ज्योतिषांनी करावे,संशोधनावर भर द्यावा.अभ्यास पूर्ण करून मगच मार्गदर्शनाकडे वळावे. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करताना संशोधन महत्वाचे आहे. संशोधनावर भर दिला तर ज्योतिष हे जग पादाक्रांत करेल’,असे प्रतिपादन रवींद्र प्रभुदेसाई यांनी यावेळी केले.
ते म्हणाले,’ चॅट जीपीटी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स पेक्षाही ज्योतिष पुढे जाऊ शकते .काळाच्या आधी आपल्याला काही गोष्टी समजू शकणार असतील आणि त्यातील ९० टक्के गोष्टी बरोबर येत असतील तर ज्योतिष हे शास्त्र म्हणून जगात पुढे नेले पाहिजे . ज्योतिष संमेलनाच्या निमित्ताने विविध गोष्टींवर उहापोह होत आहे,
ही अतिशय चांगली गोष्ट आहे’.ज्योतिषशास्त्राचा प्रचार-प्रसार करण्यासाठी या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असल्याची भूमिका श्री ज्योतिष संशोधन केंद्राच्या संचालिका डॉ.सौ. ज्योती जोशी यांनी प्रास्ताविकात स्पष्ट केली. ‘ज्योतिषशास्त्र अ ब क ड ‘,’अष्टकवर्ग एडव्हान्स भाग -२’,’अक्षय पात्र -२’,’लीला टॅरो -खंड ३’ या ‘पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले.
अधिवेशनाला संपूर्ण महाराष्ट्रातून ज्योतिषप्रेमी व मान्यवर उपस्थित आहेत. सौ.जयश्री बेलसरे यांनी स्वागत केले.हेमंत बर्वे यांनी सूत्रसंचालन केले,मोरेश्वर मराठे यांनी आभार मानले.यानंतर सकाळ व दुपारच्या सत्रांमध्ये ज्योतिषशास्त्रातील महत्त्वपूर्ण विषयांवर उपस्थित तज्ज्ञ मान्यवरांनी ज्योतिषप्रेमींना मार्गदर्शन केले.
त्यात अनिल वत्स,नितीन कश्यप ,प्रदीप पंडित,मकरंद सरदेशमुख ,नीलम पोतदार ,सौ सुनीता पागे ,जितेंद्र वझे,संतोष जोशी,आरती घाटपांडे,सुनील पुरोहित यांचा समावेश होता.*सोमवारी ज्योतिश्री पुरस्कार प्रदान सोहळा*.दि. १२ जून २०२३ रोजी म्हणजे अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात तज्ज्ञ मान्यवरांच्या व्याख्यानाने होईल.
त्यात सिद्धेश्वर मारटकर(सत्ता संघर्ष ),आनंद घुर्ये (डिस्टन्स पामेस्ट्री ),ज्योती जोशी (‘ज्योती जोशी ज्योतिष पद्धती’),नंदकिशोर जकातदार(ग्रह गोचर),श्वेता बोकील (अ.ल.भागवत पद्धती),संजय बुधवंत(वास्तू सक्सेस चार्ट ),गौरी पोळ (कुंडली मिलनातील धोके ),सचिन बेहरे (ग्रहबल ) हे मार्गदर्शन करतील.
दुपारच्या सत्रात २ वाजता काही मान्यवरांना ज्योतिष क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल ज्योतिश्री जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. त्यामध्ये विजय जकातदार ( पुणे) ,वि. श. अष्टेकर(पुणे) यांचा समावेश आहे . सौ. सुमती सावंत यांना ज्योतिश्री आदर्श महिला ज्योतिर्विद पुरस्कार, योगेश्वर गौडा ,सौ. दीपश्री जोशी याना ज्योतिश्री पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
यानंतर सायंकाळी ज्योतिष विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याने अधिवेशनाचा समारोप होईल.अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी सायंकाळी ४ वाजता डॉ.मधुसूदन घाणेकर अतिथी म्हणून उपस्थित राहतील तर आदिनाथ साळवी अध्यक्षस्थानी असतील.