प्रतिमा उत्कट – रंग कथा २३ ‘ चित्र प्रदर्शनात रंगला कलाकारांशी संवाद !_कला आणि रसग्रहण यातील दरी कमी व्हावी:मिलिंद मुळीक


*’प्रतिमा उत्कट – रंग कथा २३ ‘ चित्र प्रदर्शनात रंगला कलाकारांशी संवाद !._कला आणि रसग्रहण यातील दरी कमी व्हावी:मिलिंद मुळीक_
.*ज्ञान प्रबोधिनी प्रशाला माजी विदयार्थी मंडळाचे आयोजन*
पुणे :ज्ञान प्रबोधिनी प्रशाला माजी विदयार्थी मंडळाच्या – कला आणि संस्कृती विशेष उद्दिष्ट गटाने ‘आर्टिस्ट कट्टा ‘ या संस्थेच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘प्रतिमा उत्कट – रंग कथा २३ ‘ या चित्र प्रदर्शनात १० जून, शनीवारी सायंकाळी साडे सहा वाजता ज्येष्ठ चित्रकार मिलिंद मुळीक ,मंजिरी मोरे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. संदीप खेडकर यांनी या दोघांशी संवाद साधला.
या संवाद कार्यक्रमांना पुणेकर रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. राजेंद्र वैद्य, अजय फाटक यांनी मिलिंद मुळीक, मंजिरी मोरे यांचे स्वागत केले. ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी,मिलिंद संत, डॉ. समीर दुबळे, डॉ. विवेक कुलकर्णी , प्रा.योगेश देशपांडे , अस्मिता अत्रे, श्रीनिवास देसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.मिलिंद मुळीक म्हणाले, ‘वॉटर कलर माध्यम आता जास्त वापरले जात आहे. मॉडर्निझम आणि ट्रॅरिशनल कलेचा संगम होऊन नवी चित्रशैली (स्टाईल ) तयार झाली.
तीच आपण आज सर्वत्र पाहत आहोत. पुस्तक लेखना पाठोपाठ २००६ पासून मी कार्यशाळातून प्रशिक्षणाचे माध्यम निवडले.१० हजार पेक्षा अधिक कलाकार त्यातून शिकून गेले आहेत. हौशी कलाकारांसाठी हे चांगले माध्यम आहे. आता सोशल मीडियावर देखील प्रत्येकाचे आता प्रदर्शन भरते आणि अधिकाधिक रसिकांपर्यंत पोचते. पण, त्यात मिडिऑक्रसी वाढण्याचा धोका आहे ‘.’पुस्तकाच्या कव्हरसाठी चित्राचा आशय कळणे महत्वाचे असते, मात्र फाईन आर्ट प्रकारातील चित्रात आशय कळालाच पाहिजे, याची आवश्यकता नसते,
व्हिज्युअल इमोशन शब्दावाचून येते, हे लक्षात घेतले पाहिजे. कला समीक्षण, रसग्रहण (अॅप्रिसिएशन ) आणि रसिक यातील दरी कमी झाली पाहिजे ‘,असेही मुळीक यांनी सांगीतले.’सिनेमा, नाटक आणि अन्य कलांच्या रसग्रहणावर कार्यशाळा होतात,
पण चित्रकला रसग्रहणावर अधिक कार्यशाळा होण्याची गरज आहे. त्यातून चित्र आणि चित्र शैलींबद्दल रसिकांची समज वाढू शकतात. चित्रकलेच्या स्पर्धाही अनावश्यक आहेत ‘, असेही ते म्हणाले. मंजिरी मोरे म्हणाल्या, ‘ प्रत्येकाचा कलेविषयी दृष्टीकोण वेगळा असतो.चित्र हे चित्रकाराचे व्हीज्युअल एक्स्प्रेशन असते,
त्याला शब्दाचा वेगळा आधार देण्याची गरज नसते. ही अभिव्यक्ती रसिक म्हणून आपण तशीच स्वीकारली पाहिजे .’*रविवारी समारोप*’प्रतिमा उत्कट- रंगकथा २३’ हे चित्र प्रदर्शन ११ जून २०२३ पर्यंत बालगंधर्व कला दालन, पुणे सकाळी १० ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहील.
या प्रदर्शनाचे वैशिष्टय़ म्हणजे यामधे ८० हून अधिक कलाकारांनी विविध विषयांवर विविध माध्यमातून काढलेली चित्रे प्रदर्शित केली आहेत.दुसरे वैशिष्टय़ म्हणजे हे कलाकार वय वर्षे १० ते ८५ अशा विविध वयोगटातील आहेत
. तसेच विशेष नमूद करण्यासारखी बाब म्हणजे यातील काही कलाकार नागरी वस्तीतील आहेत तर काही दिव्यांग माजी सैनिक आहेत.याशिवाय प्रत्येक दिवशी प्रदर्शनाबरोबरच अनेक मान्यवर कलाकारांची प्रात्यक्षिके आणि संवाद सत्रे आयोजित केलेली आहेत .११ जून रोजी सकाळी साडे दहा वाजता सायली भगली-दामले यांचे प्रात्यक्षिक, सायंकाळी ४ वाजता डॉ मुक्ता अवचट-शिर्के यांचे प्रात्यक्षिक अशी सत्रे होणार आहेत. ११ जून रोजी सायंकाळी ६ वाजता समारोप कार्यक्रम होणार आह