वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेली जाहिरात ही शिवसेनेने दिली नाही- उदय सामंत


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – राज्यातील सर्व वृत्तपत्रांमध्ये आज प्रसिद्ध झालेली जाहिरात ही शिवसेनेने दिली नाही. ही जाहिरात शिवसेनेमार्फत देण्यात आलेली आहे असा कुणीही गैरसमज करून घेऊ नये. तर राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही ताकदीचे नेते आहेत. यात शंका असण्याचे कारण नाही. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये कुठेही संभ्रमाचे वातावरण निर्माण होत नाही
दरम्यान, जाहिरातीवरून प्रवक्ते अतुल लोंढे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. ते म्हणाले, “आपणच सर्व्हे करून घ्यायचा आणि आता मला जनतेची कशी पसंती आहे, हे दाखवून देण्याचा हा प्रयत्न आहे. हा प्रयत्न खोटा असून तो मागच्या काही निवडणुकांमध्ये दिसून आला. येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी लोकसभेच्या ४२ जागा जिंकेन. तर विधानसभेच्या २०० हून अधिक जागा महाविकास आघाडीच्या असतील. २०२४ नंतर एक होते
शिंदे ही स्टोरी महाराष्ट्रात लिहिली जाईल.”दरम्यान, कोल्हापूर दौऱ्यावर असलेले उद्योगमंत्री यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही ताकदीचे नेते असल्याचे म्हटले आहे. या जाहिरातीत देशात नरेंद्र आणि राज्यात शिंदे असा उल्लेख केला आहे. तसेच मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांना २६.१ टक्के तर देवेंद्र फडणवीस यांना २३.०२ टक्के लोकांनी पसंती दिल्याचा दावा केला आहे. फडणवीस यांच्यापेक्षा शिंदेंना मुख्यमंत्रीपदासाठी अधिक पसंती असल्याचे या जाहीरातीत नमूद केले आहे. यावरून उदय सामंत यांनी सारवासारवा करण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्यातील सर्वच प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर आज मंगळवारी (ता. १३) झळकलेली जाहिरात विशेष लक्ष वेधून घेत आहे. या जाहिरातीत देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे असा उल्लेख आहे. आतापर्यंत देशात नरेंद्र-महाराष्ट्रात देवेंद्र अशी घोषण होत होती. आता मात्र देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात होत आहे. या जाहिरातीमुळे राज्यात आता चर्चांना उधाण आले आहे.
या जाहिरातील शिवसेना आणि भाजपला जनतेची पसंती असल्याचा दावा करण्यात आला आहे. राज्यातील जनतेने मुख्यमंत्री म्हणून यांना पसंती दिल्याचाही दावा केला आहे. या जाहिरातीवरून विरोधकांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेसकडून हा सर्व्हे शिवसनेने आपल्या बाजूने करून घेतल्याचा थेट आरोप केला आहे. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी या जाहिरातीबाबत स्पष्टीकरण देण्यास सुरूवात केली आहे. हा सर्व्हे एका खासगी वृत्तवाहिनीने केल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे