भारती विद्या भवनमध्ये १७ जून रोजी ‘खमाज रंग ‘भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन


विद्या भवनमध्ये १७ जून रोजी ‘खमाज रंग ‘*भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनच्या**सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन
पुणे ःभारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘खमाज रंग ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.शनीवार ,१७ जून २०२३ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम होणार आहे.
खमाज थाटातील खमाज, तिलक कमोद, व देस या तीन रागांवर आधारित बंदिश, नाट्य पदे व तराणा व शास्त्रीय संगीतावर आधारित मेडले व जुनी हिंदी मराठी गाणी या कार्यक्रमात सुचेता अवचट सादर करणार आहेत.
सविता सुपनेकर, प्रभंजन पाठक (व्हायोलिन),अनुराग अलुरकर (तबला), चंद्रकांत चिट्टे (सिंथेसायझर),उमाशंकर बेलवाले(हार्मोनियम) हे साथसंगत करणार आहेत. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.हा कार्यक्रम विनामूल्य आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १६७ वा कार्यक्रम आहे.