भारती विद्यापीठ आयएमईडी मध्ये दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन


‘आऊटकम बेस्ड एज्युकेशन’ विषयावर मंथन
ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – पुणे :
भारती अभिमत विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आय एम इ डी) तर्फे आयोजित दोन दिवसीय ‘आऊटकम बेस्ड एज्युकेशन’ या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन १६ जून रोजी सकाळी डॉ. नरेंद्र शर्मा (आय.आय. टी. कानपूर) यांच्या हस्ते आणि भारती विद्यापीठ व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता तसेच आयएमडीचे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
ही कार्यशाळा १६ आणि १७ जून रोजी होत आहे. भारती विद्यापीठाच्या ७ व्यवस्थापनशास्त्र विषयक इन्स्टिट्यूट मधील ९० प्राध्यापक सहभागी झाले आहेत.
संयोजन समितीच्या वतीने डॉ.आर. व्ही. महाडिक, डॉ. प्रमोद पवार, सचिन आयरेकर, स्वप्निल थोरात यांनी अतिथी आणि सहभागींचे स्वागत केले. ‘आउट कम बेस्ड एज्युकेशन’ या विषयावर ही कार्यशाळा केंद्रित असून ‘ऍडमिशन टू ॲल्युमनाय’ , ‘रिक्रुटमेंट टू रिटायरमेंट’ असे अनेक विषयावर मार्गदर्शन केले जात आहे . सर्व सहभागींना प्रमाणपत्र दिली जाणार आहेत .