प्रबोधनपर नाटकाच्या प्रयोगाने शैक्षणिक वर्षाची सुरुवात !आचार्य आनंदऋषीजी शाळेतील उपक्रम…


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – पुणे: वडगांव शेरी येथील राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी विद्यालयाच्या आज प्रथम दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी ‘लांडग्यांना दृष्ट का म्हणतात ?’या प्रबोधनपर नाटिकेचा प्रयोग सादर करण्यात आला, या नाटकाला इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उस्फुर्त प्रतिसाद दिला, आणि अफवा पसरवू नये, अशा आशयाचे हे प्रभावी नाटक पाहून सर्व विद्यार्थ्यांनी ‘आम्ही यापुढे कोणत्याही प्रकारची जात, धर्म, विद्यार्थी मित्रांचे वर्ण, रंग, व्यंग याबाबत कुठलीही अफवा पसरवणार नाही’ अशी शपथ घेतली. कार्यक्रम १५ जून रोजी दुपारी १२ वाजता झाला.
याविषयी शाळेचे मुख्याध्यापक सूरज कुलकर्णी ,युक्रांदचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त संदीप बर्वे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.’लांडग्यांना दुष्ट का म्हणतात ?’ हे मूळ फ्रेंच कथाकार क्वेन्तं ग्रेबॉ यांनी लिहिलेल्या नाटकाचा मराठी अनुवाद आहे, तो प्रणव सखदेव यांनी केला आहे. कोल्हापूरच्या यशस्वी दौऱ्यानंतर ‘लांडग्याना दुष्ट का म्हणतात?’ नाटकाचा पुण्यात प्रयोग झाला. आज शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांपुढे हे नाटक गौतमी आहेर व कृतार्थ शेवगावकर यांनी सादर केले, त्याला विद्यार्थ्यांनी अतिशय उत्फुर्त प्रतिसाद दिला.
‘लांडग्यांना दुष्ट का म्हणतात ?’ ची मूळ फ्रेंच कथा क्वेन्तं ग्रेबॉ यांची आहे.मराठी अनुवाद प्रणव सखदेव यांनी केला आहे.नाटय रूपांतर शंतनू सायली यांचं आहे.दिग्दर्शन महेश खंदारे यांचे आहे.
चित्र शुभम साठे यांचे आहे. गौतमी आहेर, कृतार्थ शेवगावकर यांनी अभिनय केला आहे.निर्मिती : कहानीघर आणि ‘ नाटक दहा बाय वीस ‘ यांची निर्मिती आहे.कोरो इंडिया, ज्योत्स्ना प्रकाशन,युवक क्रांती दल, कुमार आहेर यांचे विशेष सहकार्य लाभले.लांडगा एक सर्वसामान्य प्राणीच, प्राणिसंवेदनेनुसार जगणारा. पण त्याच्यावर दुष्टावा आरोपित केला जातो आणि प्रत्यक्षाहूनही काही भलतीच गडद, विखारी, अक्राळविक्राळ प्रतिमा निर्माण केली जाते. हे एखाद्या माणसाबाबत वा समाजाबाबतही घडू शकते, याचा प्रत्यय देणारी रूपककथा ‘लांडग्यांना दुष्ट का म्हणतात…?’ या नाट्यप्रयोगात साकारते.