पुण्यातील लाचखोर अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड अखेर निलंबीत


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – पुण्यातील महसूल विभागतील अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल गणपतराव रामोड यांना ९ जून रोजी लाच घेतल्याप्रकरणी रंगेहात पकडण्यात आले होते. ही कारवाई ‘सीबीआय’ने केली होती. त्यांना आठ लाख रुपायांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली होती.लाचखोर अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड यांचे निलंबन करण्यात आले आहे.
अनिल रामोड यांच्या कार्यालयासह बाणेर (पुणे) आणि नांदेड येथील घरांवर ‘सीबीआय’ने छापे टाकले होते. या कारवाईत ‘सीबीआय’च्या हाती मोठे घबाड लागल्यामुळे रामोडची राज्यभर खूप चर्चा झाली
. छापा टाकल्यानंतर रामोड यांच्याकडे तब्बल सहा कोटी रुपयांची रोकड आणि बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. या कारवाईमुळे महसूल विभागासह राज्यात खळबळ उडाली आहे.
रामोड यांच्या निलंबनानंतरही त्यांनी पुणे मुख्यालय सोडून जाता कामा नये. कोणतीही खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करण्यावरही करता कामा नये. तसेच, विभागीय आयुक्तांची परवानगी न घेता पुणे शहर सोडू नये, असे निलंबनाच्या आदेशात नमूद केले आहे
राज्य सरकारच्या वतीने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. मागील आठवड्यात त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. हा प्रस्ताव राज्य सरकारला सुपूर्द करण्यात आले होते. त्यानुसार राज्य सरकारने रामोडच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत४८ तासांपेक्षा अधिक पोलीस कोठडीत राहिल्याचा ठपका ठेवत, या कारणामुळे रामोड यांना विभागीय आयुक्त पदावरून निलंबित करण्याचे आदेश सरकारने काढले आहेत.
सीबीआयच्या मागणीनुसार विभागीय आयुक्तलयाने राज्य सरकारकडे रामोड यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला होता. अखेर या प्रस्तावाला मान्यता देत, सरकारने रामोडच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत अनिल रामोड यांना पालखी महामार्गासाठी भूसंपादनच्या मोबदल्यातील लाच प्रकरणी अटक करण्यात आली आहे. मोबदला देण्यासाठी त्यांनी दरपत्रक काढल्याचा तक्रारदार अॅड. याकूब साहेबू तडवी यांनी केला होता. यावेळी त्यांनी रामोडांच्या एक कोटी रुपये मोदबदल्याच्या बदल्यात १० लाख रुपये लाच घेत असल्याचे सांगितले. दरम्यान, रामोड यांच्या येथील घरातून मोठ्या प्रमाणत पुणे आणि नांदेड बेहिशेबी रोकडसह संपत्ती हाती लागली आहे.