तेलंगणाचे मुख्ममंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर यांचा BRS मध्ये प्रवेश


तेलंगणाचे मुख्ममंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर यांनी काल (बुधवारी) भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला.
सष्टेंबर २०२१ मध्ये त्यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. त्याच्या प्रवेशावर भाजपचे नेते, आमदार प्रविण दरेकर यांनी जोरदार टीका केली होती
प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी एका जाहीर सभेत यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला होती. ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष रंगलेल्या गालांचे मुके घेणारा पक्ष आहे’, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. त्यानंतर राष्ट्रवादीने दरेकरांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती
लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला आहे. सष्टेंबर २०२१ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. त्यावर भाजपने टीका केली होती.”राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे,
या पक्षाला गरीबांकडे पाहण्यासाठी वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष आहे. अशी घणाघाती टिका केली.प्रविण दरेकरांना सुरेखा पुणेकरांनी आपल्या खास शैलीत उत्तरही दिलं होतं.
“घाण तोंडाचे प्रवीण दरेकर भाजपसारख्या चांगल्या लोकांच्या पक्षात कसे काय,” असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहेमोहोळ विधानसभा मतदार संघातून २००९ मध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसकडून त्या इच्छुक असल्याची चर्चा होती. पण पक्षप्रवेश झाला नव्हता