आऱोपी ”अर्जुन ठाकरे” हे भाजपचे असल्याने राजकीय दबावातून कारवाई होत नाही…

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – २८ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती अर्जुन ठाकरेंसह (वय ६६) चौघांवर ११ जून रोजी पिंपरी पोलिस ठाण्यात झाला. अशा संवेदनशील गंभीर गुन्ह्यात इतरवेळी तत्परतेने कारवाई करणाऱ्या पोलिसांनी या गुन्ह्यात,मात्र बारा दिवस उलटल्यानंतरही आऱोपी ठाकरे हे भाजपचे असल्याने राजकीय दबावातून ती केली नसल्याचा दावा या पीडीत तरुणीच्या वकिलांनी केला आहे
हा गुन्हा पुण्यातील लष्कर पोलिस ठाण्याकडे ११ तारखेलाच वर्ग करण्यात आला. तेथील तपासाधिकारी एपीआय प्रियंका शेळके यांनी मुख्य आरोपी महेश्वरी रेड्डीच्या शोधासाठी तीन पथके परराज्यात जाऊन आजच परत आल्याच सांगितलं
चिरागउद्दीन शेख त्याची बायको या दोन आरोपींनी अटकपूर्व जामीन घेतल्याची माहिती त्यांनी दिली. तर, चौथा आरोपी ठाकरे हे पिंपरीतील त्यांच्या घरी मिळून आले नसल्याचे त्या म्हणाल्या. तर, पीडीत तरुणी व तिच्या वकिलानेही आरोपी व त्यातही ठाकरे हे मोकाट फिरत असल्याचे आज सांगितले.
ठाकरेंचा अटकपूर्व जामीन पुण्यातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. राठोड यांनी २० तारखेला फेटाळून लावलेला आहे. त्यानंतरही त्यांना अटक झालेली नाही.
पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या एका आमदाराच्या पाठिंब्यामुळे होत नसल्याचे त्यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका मंदाकिनी ठाकरे सांगत फिरत आहे, असा दावा अॅड. जगताप यांनी केला आहे. एरव्ही महिला अत्याचाराची तातडीने दखल घेणाऱ्या राज्य महिला आयोग व त्याच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पीडीत तरुणीचा फोन घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले
इतर महिला अत्याचार प्रकरणात तातडीने दखल घेणाऱ्या राज्य महिला आयोगानेही या परप्रांतीय (पश्चिम बंगाल) तरुणीवरील अत्याचाराची दखल घेतली नसल्याचे तिचे वकिल अॅड. आकाश जगताप यांनी आजसांगितले. म्हणून त्यांनी याबाबत आता थेट सीएमओकडे धाव घेतली आहे.
ठाकरे दांपत्य सध्या भाजपमध्ये आहेत पिंपरी महापालिकेतील सत्ताकाळात अर्जून ठाकरेंनी शिक्षण मंडळाचे सभापतीपद भूषविलेले आहे. हा गुन्हा दाखल होऊन १२ दिवस उलटल्यानंतरही एकाही आरोपीला पोलिसांनी अद्याप अटक न केल्याने या बळी पडलेल्या तरुणीने ज पुन्हा संपर्क करून आपल्याला न्याय देण्याची विनंती केली.
तिच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत तर गुन्हाही नोंदवून घेण्यास तयार नव्हते. त्याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर तो दाखल करण्यात आला. मात्र, आता त्यात आरोपींना अटक होत नाहीये. त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी तत्परतेने कारवाई न केल्याने त्यांना वेळ मिळून दोन आरोपींनी अटकपूर्व जामीन दोघांनी घेतला आहे. तिसरा आरोपाही तो घेण्याच्या तयारीत आहे. नोकरीसाठी ही पीडीत तरुणी गेल्याच महिन्यात पुण्यात आली होती.