पुणे महापालिकेचे औंध कुटी रूग्णालय सर्व सोयीसुविधांनी युक्त करण्याचा निर्धार- आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे – ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील पुणे महापालिकेच्या औंध कुटी रुग्णालयाची पाहणी केली आणि रुग्णालयाच्या विविध समस्यांबाबत सविस्तर आढावा अधिकाऱ्यांसमवेत घेतला. या रुग्णालयाचा फायदा औंध परिसरातील गर्भवती महिला भगिनी घेतात. परंतु या रुग्णालयामध्ये सिझेरियन प्रसुतीची सोय नाही, तसेच रुग्णालयाची इमारत जुनी असून पावसाळ्यामध्ये गळती होते, या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता आहे, अशा त्रुटी या भेटीदरम्यान निदर्शनास आल्या, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.महापालिकेचे औंध कुटी रूग्णालय सर्व सोयीसुविधांनी युक्त करण्याचा निर्धार असून महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे पाठपुरावा करेन, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (शुक्रवारी) जाहीर केले.या समस्यांबाबत लवकरच पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पुणे महापालिका आरोग्य प्रमुखांकडे पाठपुरावा करणार असून लवकरच या समस्या सोडवून औंध कुटी रुग्णालय सर्व सोयीसुविधायुक्त करण्यासाठी प्रयत्न करेन, असे आश्वासन आमदार शिरोळे यांनी रूग्णालय भेटीच्या वेळी दिले.यावेळी बाळासाहेब रानवडे, आनंद छाजेड, सचिन वाडेकर, सचिन मानवतकर, सागर मदने, सुप्रीम चोंधे, सुशील लोणकर आदी उपस्थित होते.

Latest News