2024 मध्ये मावळ लोकसभा मतदार संघातून मीच जिंकणार- खासदार श्रीरंग बारणे

shreerang-barane

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कितीही ताकद लावली तरी, २०२४ मध्ये शिवसेना-भाजपचा उमेदवार म्हणून मावळ लोकसभा मतदार संघातून मीच जिंकणार, असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला. ते पंढरपूरमध्ये बोलत होते. हिंदुत्त्वाचा खरा वारसदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आहेत. ते राज्यात अत्यंत प्रभावीपणे काम करत आहेत, त्यांचा विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत, असंही खासदार आप्पा बारणे यांनी म्हटलं आहे

. 2024 च्या निवडणुकीबाबत बोलताना बारणे म्हणाले, 2024 च्या निवडणुकीत आणखी बरीच स्थित्यंतरे होतील. विकासाच्या मुद्द्यावर 2024 ची निवडणूक होईल आणि या निवडणुकीत ही जनता विकासाला महत्त्व देईल.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जागा वाटपा बाबत निर्णय घेतला आहे

. पुढच्या काळात ते निर्णय जाहीर करतील, सन्मानाने जागावाटप होईल, असही श्रीरंग बारणे यांनी म्हटलं आहे.मावळ लोकसभा मतदारसंघाबाबत बोलताना बारणे म्हणाले, मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा मी 2 लाख 53 हजार मतांनी पराभव केला.

2014 असेल 2019 असेल मी समोर कोण आहे हे बघितलं नाही. समोर कोण आहे याची मला चिंता नाही. मी जनतेतून काम करुन मावळ मतदारसंघात वेगळा ठसा निर्माण केला आहे.

त्यामुळे 2024 च्या निवडणुकीतही मावळ मतदारसंघातून मी विजयी होईल, असा विश्वास बारणेंनी यावेळी व्यक्त केला. समोर कोण आहे, हे पाहून मी कधीच निवडणूक लढवली नाही.

यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावही जोरदार टीका केली.यावेळी बोलताना श्रीरंग बारणे म्हणाले, देशभरातील सगळे विरोधी पक्ष एकत्र आले तरी 2024 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा केंद्रात भाजपचे सरकार येणार आहे.२०२४ मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहेत

Latest News