पंकजा मुंडे यांनी (BRS) बीआरएस पक्षात यावे, त्यांना मुख्यमंत्री करू…


नागपूर :(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – ):
पंकजा मुंडे यांनी बीआरएस पक्षात यावे, त्यांना मुख्यमंत्री करू, अशी ऑफर बीआरएस पक्षाचे राज्य समन्वयक बाळासाहेब सानप आणि शिवराज बांगर यांनी दिली आहे
. राज्याच्या राजकारणात भारत राष्ट्र समितीने शिरकाव केला असून प्रमुख पक्षातील अनेक आजीमाजी नेते सध्या बीआरएसमध्ये प्रवेश करत आहेत. त्यात बीआरएस पक्षाने आता भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. बीआरएस पक्षाचे समन्वयक बाळासाहेब सानप म्हणाले की, “बीआरएसमध्ये नाराज नाही तर अनेक नवीन चेहरे रोज सहभागी होतात,
जे आमदार २-३ हजारांनी पडलेत तेदेखील पक्षाच्या संपर्कात आहेत. पंकजा मुंडे या बीआरएस पक्षात आल्या तर आम्ही त्यांचे स्वागत करू. या महाराष्ट्रात एक सक्षम महिला या नेत्याने जर भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला तर महाराष्ट्र त्यांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही.”
भाजपमध्ये पंकजा मुंडेंना डावललं जात आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये घुसमट आहे, त्यांनी भाषणामध्येही नाराजी बोलून दाखवली, असा दावाही बीआरएसने केला आहे. ‘बीआरएस संपूर्ण ताकदीने महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार आहे.
पंकजा मुंडे यांनी बीआरएसमध्ये येऊन शेतकऱ्याचे सरकार राज्यात आणण्यासाठी सोबत यावं. महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून बीआरएस त्यांचा विचार करेल,’ असं बीआरएसने सांगितलं आहे.पंकज मुंडेंना दोन वर्षांपूर्वीच इम्तियाज जलिल म्हणाले होते, असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले आहेत
. तर बीआरएसने पंकजा मुंडे यांना थेट मुख्यमंत्रिपदाचीही ऑफर दिली आहे. या चर्चांवर आता पंकजा मुंडे काय उत्तर देणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या राजकीय हालचालींवर इतर पक्षही लक्ष ठेवून आहेत
. पंकजा मुंडेंनी बीआरएसनं ऑफर दिल्याची माहिती समोर आली असतानाच एमआयएमही त्यांच्यासाठी आग्रही आहे.दोन वर्षांपूर्वी पंकजा मुंडेंना एमआयएमनंही पक्षात येण्याची ऑफर दिल्याचा दावा असदुद्दीन ओवैसी यांनी केलाय.
ते संभाजीनगरमध्ये बोलत होते. पंकजा मुंडेंच्या ठाकरे गटात जाण्याच्या चर्चा सुरू असतानाच बीआरएसनंही त्यांना ऑफर दिलीय. पंकजा मुंडे यांच्यासाठी अनेक पक्षांनी फिल्डिंग लावल्याचं या निमित्तानं अधोरेखित झालंय.