पुण्यात MPSC करणाऱ्या तरुणीवर एकतर्फी प्रेमातून प्राणघातक हल्ला…

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –

राज्यात सहावी आलेली दर्शना पवारच्या हत्येची घटना ताजी असतानाच पुण्यात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आली आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत एमपीएससी करणाऱ्या तरुणीवर एका तरुणाने प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे.प्राथमिक माहितीनुसार, संबंधित तरुणी आज सकाळी कॉलेजला निघाली होती. यावेळी तरुणीसोबत तिचा दुसरा मित्रही होता. सदाशिव पेठेतून जात असताना तरुण त्यांच्या मागून आला आणि अचानक तिच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

ज्यावेळी तरुणाने , तरुणानं तिच्यावर कोयत्यानं हल्ला केल्याने ती जखमी झाली. जीव मुठीत घेऊन पळत सुटली. तिचा मित्रही कोयता घेऊन तिच्या मागे पळत होता. ती मदत मागत होती. पण तिच्या मदतीसाठी कुणीही पुढे आलं नाही.

 पण ती पळत असताना एक तरुण तिच्या मदतीसाठी धावून आला. कोयता हातात असलेला तरुण तरुणीच्या डोक्यावर वार करणार एवढ्यात मदतीसाठी धावून आलेल्या तरुणाने त्याचा कोयता धरला त्याला रोखलं. यानंतर इतर लोक पुढे सरसावले आणि हल्लेखोराला चोप दिला.

उपस्थितांनी या प्रकाराची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तरुणाला ताब्यात घेतलं. एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहेलेशपाल जवळगे असे तरुणीला वाचवणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

सोलापूर जिल्ह्यातील असून तोही स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी अभ्यासिकेत निघाला होता. रस्त्यात त्याला एक तरुणी पळताना दिसली. त्याने हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर तो तरुणीचा जीव वाचवण्यासाठी धावला.

Latest News