संभाजी भिडे च्या वादग्रस्त विधानांमुळे नवीन वाद पेटण्याची शक्यता….

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
महिला पत्रकाराशी बोलताना ‘आमची अशी भावना आहे, प्रत्येक स्त्री भारतमातेचं रूप आहे. भारत माता विधवा नाही. कुंकू लाव, मग तुझ्याशी बोलेन,’ अशी प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी दिली. यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. तसेच राज्य महिला आयोगाने देखील भिडे यांना नोटीस पाठवली होती. तसेच टिकलीबाबत केलेल्या वक्तव्याचा तातडीने खुलासा करावा असं म्हटलं होतं. पुण्यातील दिघी येथे रविवारी (दि.२५ ) संभाजी भिडेंचं जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जन गण मन हे राष्ट्रगीत होऊ शकत नाही. कारण रवींद्रनाथ टागोर यांनी ते 1898 ला इंग्लंडच्या राजाच्या स्वागतासाठी लिहिले होते. 15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. यादिवशी भारताची फाळणी झाली. यादिवशी सर्वांनी उपवास करावा आणि दुखवटा पाळावा असंही भिडे म्हणाले आहेतशिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे हे नेहमी त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. आता पुन्हा त्यांच्या एका विधानामुळे नवीन वाद पेटण्याची शक्यता आहे. भिडे यांनी 15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. यादिवशी देशाची फाळणी झाली होती. तो काळा दिवस असल्याचं वादग्रस्त विधान केलं आहे.भिडे म्हणाले, 15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्यदिवस नाही. यादिवशी फाळणी झाली होती. ज्या स्वातंत्र्यासाठी लक्षावधी पोरांनी फासावर लटकवून घेतलं. वंदे मातरम म्हटलं ते व्यर्थ नाही. आता ठाम निर्धार करायचा. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन मान्य पण ते हांडगं स्वातंत्र्य असेल. ते पत्करलं पाहिजे. यावर्षीपासून 9 च्या ठोक्याला भगवा झेंडा घ्यावा. छोटासा तिरंगाही दखलपात्र म्हणून घ्यावा असे विधान त्यांनी केले.जोपर्यंत भारताचा राष्ट्रध्वज भगवा म्हणून स्विकारला जात नाही तोपर्यंत शांत बसायचे नाही. आपली स्वातंत्र्य देवता जोधाबाईसारखी मुसलमानांच्या जनानखान्यातील बटीक नसेल तर ती सीतेसारखी पतिव्रता असेल. तिरंगा ध्वज राष्ट्रध्वज म्हणून स्विकारणारी ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटीविषयीही आक्षेपार्ह विधानही संभाजी भिडे यांनी केलं आहे