BRS ला महाराष्ट्रातील नेते का घाबरतात – के. चंद्रशेखर राव

आम्ही शेतकऱ्यांचे टीम आहेात. बीआरएस ही लोकांचे भले करणारी टीम आहे, आम्हाला कुणाची ए टीम, बी टीम बनण्याची गरज नाही. आमची आतातर महाराष्ट्रात सुरुवात झाली आहे. बीआरएससाख्या एवढ्या छोट्या पार्टीला महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेते का घाबरत आहेतअसा सवाल भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी राज्यातील नेत्यांना केला

पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे आज शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले हो. त्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचेनेते भगीरथ भालके यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये जाहीर प्रवेश केला.

या सभेला मुख्यमंत्री केसीआर यांच्यासह त्यांचं अख्खं मंत्रिमंडळ, आमदार, खासदार आणि वरिष्ठ नेते तसेच, महाराष्ट्रातील माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, माणिक कदम हे पदाधिकारी उपस्थित होते. प्रवेशाच्या कार्यक्रमात राव बोलत होते

केसीआर म्हणाले की, आम्ही विठ्ठलाच्या दर्शनासाठी जेव्हा तेलंगणातून निघालो, तेव्हा आम्हाला काय काय ऐकवण्यात आलं. तुम्ही दर्शनासाठी या, पण राजकारण करू नका, असे भाजपवाल्यांकडून सांगण्यात आले. पंढरपूरमध्ये मी काही बोललो नाही. मात्र या सभेत मी त्यावर बोलणार आहे. आमची पार्टी आता कुठे महाराष्ट्रात आली आहे,

मग एवढा आक्रोश का आहे, सर्व पार्टीमध्ये. एवढ्या छोट्या पार्टीला का घाबरत आहेत, सर्वजण. गेल्या चार पाच महिन्यांत आम्ही महाराष्ट्रात काम करत आहोत. आम्हाला भाजपची बी टीम म्हटलं गेलं आहे.

पण, आम्ही फक्त शेतकरी, दलित, अल्पसंख्याक लोकांची टीम आहेात. शेतकरी बीआरएसशी जोडले जात आहेत, त्यामुळे हे सर्व लोक आमच्यावर टीका करत आहेत.पंढरपूर : भारत राष्ट्र समिती कुणाचीही टीम नाही, आमची स्वतःची पार्टी आहे.

महसूल विभागातील तलाठी ही यंत्रणा बरखास्त करायला पाहिजे. केंद्र सरकारने सुरू केलेली डिजिटल इंडिया ही योजना महाराष्ट्र सरकारने का सुरू केली नाही.

ते करणारे लोक उलटसुटल बोलत राहतात. तलाठी लोक आमच्याविरोधात मत टाकतील. ते आमच्या विरोधात गेले तरी हरकत नाही. मात्र, जनतेला जे पाहिजे, ते राज्यकर्त्यांनी केले पाहिजे. तेलंगणात संबंधित शेतकऱ्याने अंगठा (बायोमेट्रीक) लावला, तरच जमिनीचा मालकी हक्क बदलतो.

जमिनीची मालकी तलाठी, महसूल इन्स्पेक्टर, विभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, महसूल सचिव, महसूल मंत्री, मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री हे परस्पर शेतकऱ्यांच्या जमिनीचा मालकीहक्क बदलू शकत नाही, तशी यंत्रणाच आम्ही तयार केली आहे, असा दावाही चंद्रशेखर राव यांनी केला

.केसीआर म्हणाले की, महाराष्ट्रातही बायोमेट्रिक पद्धती लागू करू शकतात. निवडणुकीला आणखी बराच वेळ आहे, त्यामुळे सरकारला हे करता येऊ शकतं. जनतेच्या हिताची कामं करायाची सोडून येथील नेतेमंडळी उलटसुटल बोलत राहतात. केसीआरला भाजपची ए टीम, बी टीम असं बोलतात. पण मी संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतातील नागरिकांना सांगतो की, बीआरएस कुणाचीही टीम नाही, आमची स्वतःची पार्टी आहे. आम्ही शेतकऱ्यांचे टीम आहेात. आम्ही दलित, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक लोकांची टीम आहोत. बीआरएस ही लोकांचे भले करणारी टीम आहे, आम्हाला कुणाची ए टीम, बी टीम बनण्याची गरज नाही. देशात ७० कोटी शेतकरी आहेत, त्यामुळे प्रत्येक शेतकरी बीआरएस सोबत आहेत, त्यामुळे आमच्याकडे टीम येईल. आम्ही कोणाची टीम का बनू.

निवडणुकीत कोणीतरी जिंकतो, कोणीतरी हरत असतो. महाराष्ट्रात सर्व पक्षांना सत्ता मिळालेली आहे. काँग्रेसने संपूर्ण ५० वर्षे राज्य केले, त्यानंतर राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपला महाराष्ट्रातील जनतेने संधी दिली आहे. शेतकऱ्यांसाठी काम करायचे असते, तर यातील एकातरी पक्षाने त्यांच्या कल्याणाच्या योजना राबविल्या असत्या. तेलंगणासारख्या राज्यात शेतकऱ्यांसाठी सर्वकाही केले जाते. मात्र, तेलंगणात गेल्या पाच सहा वर्षांत शेतकरी हिताच्या योजना राबविल्या जात आहेत, त्या महाराष्ट्रात का नाहीत, असा सवाल त्यांनी केला महाराष्ट्र तर मोठे आणि धनवान राज्य आहे, येथे कुठल्याही गोष्टीची कमी नाही. उलट तेलंगणामधील योजना ह्या भूलभुलैया आहे. महाराष्ट्रात हे करायचे असेल तर महाराष्ट्र सरकारचे दिवाळे निघेल, असे सांगितले जात आहे. मात्र, दिवाळं जरुर निघेल. दिवाळं निघेल नेत्यांचं आणि दिवाळी होईल शेतकऱ्यांची, असा दावाही केसीआर यांनी केला आहे.

Latest News