नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थल्मॉलॉजी ‘ ला राष्ट्रीय स्तरावर मानांकन

पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –

नेत्रोपचार, नेत्रशल्यचिकित्सा क्षेत्रात देशभरातील अद्ययावत आणि प्रभावी उपचार करणाऱ्या वैद्यकीय संस्था, हॉस्पिटलच्या क्रमवारीत पुण्यातील ‘ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थल्मॉलॉजी ‘(एनआयओ) ने पहिल्या दहा क्रमांकात स्थान पटकावले आहे .

‘ आऊटलूक’ मॅगझिन ने
राष्ट्रीय स्तरावर झालेल्या या सर्वेक्षणाची क्रमवारी नुकतीच जाहीर करण्यात आली. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थल्मॉलॉजी हे ज्येष्ठ नेत्र शल्यचिकित्सक डॉ श्रीकांत केळकर यांनी स्थापन केलेले हॉस्पिटल आणि संशोधन संस्था आहे. जगभरातील अद्ययावत , आधुनिक नेत्रोपचार तंत्रज्ञान येथे उपलब्ध करण्यात आले आहे. हे हॉस्पिटल १९९३ साली स्थापन झाले .एन.आय.ओ. तसेच डॉ.श्रीकांत केळकर यांना यापूर्वीही अनेक मानसन्मान प्राप्त झाले आहेत .डॉ श्रीकांत केळकर, प्रशासक सौ. अरुणा केळकर, डॉ. जाई केळकर आणि डॉ. आदित्य केळकर यांच्यासह अनेक तज्ञ येथे येणाऱ्या रुग्णांना प्रभावी उपचार मिळवून देण्यासाठी झटतात. आतापर्यंत १० हजार हून अधिक गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत, अशी माहिती डॉ. श्रीकांत केळकर यांनी पत्रकाद्वारे दिली.

Latest News