चौथे गांधी दर्शन शिबिर ९ जुलै रोजी पुण्यात महाराष्ट्र गांधी स्मारक निधी , युवक क्रांती दलाकडून आयोजन


पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलातर्फे पुण्यात एकदिवसीय ‘ गांधी दर्शन शिबिर ‘ चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. ९ जुलै २०२३ रोजी सकाळी १० ते ६ या वेळात हे शिबीर गांधी भवन, कोथरूड, पुणे येथे होईल. ‘ गांधी दर्शन शिबिर ‘ मालिकेतील हे चौथे शिबीर आहे.

या शिबिरात ज्येष्ठ लेखक अशोककुमार पांडेय हे ‘राष्ट्रपिता म्हणून गांधीजींचे स्थान’ या विषयावर,प्रा.डॉ.ऋषिकेश कांबळे हे’गांधी-आंबेडकर आणि देशाचे भवितव्य’ या विषयावर मार्गदर्शन करतील. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी हे ‘सत्याग्रह शास्त्र’ विषयावर मार्गदर्शन करतील.कार्यशाळा प्रवेशासाठी सुदर्शन चखाले 7887630615,संदीप बर्वे,9860387827,सचिन पांडुळे 9096313022 यांच्याशी संपर्क साधावा, नावनोंदणीसाठी https://forms.gle/Jpnw4kbw5MthAPtM7 हा गुगल फॉर्म भरावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

Latest News