रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन च्या अध्यक्षपदी गिरीश मठकर


…*रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन च्या अध्यक्षपदी गिरीश मठकर*
पुणे :रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन च्या अध्यक्षपदी गिरीश मठकर आणि सचिव पदी विदुला भट यांची निवड झाली आहे. २०२३-२४ या नवीन वर्षासाठी कार्यकारिणीचे पदग्रहण ४ जुलै रोजी गांधी भवन, कोथरूड येथे पार पडले .यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतपाल मंजू फडके , सहप्रांतपाल किरण इंगळे उपस्थित होते.
यावेळी ग्रामीण भागातील मुलांसाठी आनंदी शाळा ,तसेच लाईफ सेविंग सीपीआर (CPR ) चे प्रशिक्षण यासारख्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आली. प्रा.उज्ज्वला बर्वे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी ‘ पाणी वाचवा प्रोजेक्ट ‘ अंतर्गत वॉटर एरिएटरचे वाटप करण्यात आले*
फोटो कॅप्शन* :रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन च्या पदग्रहण सोहळ्या प्रसंगी, प्रांतपाल मंजू फडके आणि सहप्रांतपाल किरण इंगळे यांच्या उपस्थितीत नवनियुक्त अध्यक्ष गिरीश मठकर, विदुला भट यांना सूत्रे प्रदान करण्यात आली